China Alerts: पुढील तीन दिवसांत पुन्हा महापुराचा धोका! चीनकडून नेपाळला इशारा, नेमका अलर्ट काय?

China Alerts Nepal Barrier Lake Flood Threat: उपग्रह छायाचित्रांनुसार, सुमारे ५,२०० मीटर उंचीवरील लँगटांग लिरुंग हिमनदीचा एक भलामोठा तुकडा तुटून सुमारे १,२०० मीटर खाली भोटेकोशीची उपनदी असलेल्या ल्हेंडे नदीच्या पात्रात कोसळला.
nepal flood

nepal flood

esakal

Updated on

Langtang Glacier Collapse: नेपाळ-चीन सीमाभागात पुन्हा एकदा महापुराचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. नदीच्या वरच्या भागात तयार झालेले नैसर्गिक सरोवर पुढील तीन दिवसांत फुटू शकते, असा सतर्कतेचा इशारा चीनने नेपाळला दिला आहे. २६ ऑगस्ट रोजी लँगटांग लिरुंग हिमनदीचा मोठा भाग कोसळल्यामुळे नेपाळमधील भोटेकोशी नदीला भीषण जलप्रलय आला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com