चीनने काही विशिष्ट देशांमधून विमाने येण्यास परवानगी दिली; पण...

वृत्तसंस्था
Wednesday, 22 July 2020

चीनमध्ये प्रवेश करण्यासाठी परदेशी तसेच चिनी नागरिकांना कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे प्रमाणपत्र बाळगणे अनिवार्य असेल. विमानात बसण्याच्यावेळी ते पाच दिवसांपेक्षा आधीचे नसावे. त्याची पडताळणी करण्याची जबाबदारी विमान कंपन्यांवर असेल.

बीजिंग - चीनमध्ये प्रवेश करण्यासाठी परदेशी तसेच चिनी नागरिकांना कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे प्रमाणपत्र बाळगणे अनिवार्य असेल. विमानात बसण्याच्यावेळी ते पाच दिवसांपेक्षा आधीचे नसावे. त्याची पडताळणी करण्याची जबाबदारी विमान कंपन्यांवर असेल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चीनच्या नागरी वाहतूक मंत्रालयाचे प्रवक्ते वँग वेनबीन यांनी सांगितले की, विविध देशांतील चाचणीच्या क्षमतेचे आमच्या वकिलातींचे अधिकारी मूल्यमापन करतील. चर्चेतून नेमका तपशील ठरेल, जो लवकरच जाहीर केला जाईल. या घडीला अनेक देशांत कोरोना साथ काहीशी नियंत्रणात आहे. आता लोकांचे एकमेकांना भेटणे आणि आंतरराष्ट्रीय विमानांची संख्या वाढणार आहे. आर्थिक उपक्रम पुन्हा सुरु करण्यासाठी तसेच धोका कमी करण्याच्या उद्देशाने हे आवश्यक असेल.

चीनने काही विशिष्ट देशांमधून विमाने येण्यास परवानगी दिली आहे, पण त्यात अद्याप भारताचा समावेश नाही.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: China allowed flights from certain countries