"चीनदेखील आता 1962 मधील राहिलेला नाही''

पीटीआय
सोमवार, 3 जुलै 2017

भारत हा आता 1962 मधील नाही, हे जेटली यांचे मत बरोबरच आहे. मात्र चीनदेखील आता बदलला आहे. चीनदेखील 1962 मधील राहिलेला नाही

बीजिंग - 2017 मधील भारत हा 1962 मधील भारत नाही, या केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या विधानावर चीनकडून तीव्र प्रतिक्‍रिया व्यक्‍त करण्यात आली आहे.

चीनसुद्धा आता 1962 मधील राहिला नसून आपल्या सार्वभौमत्वाचा अधिकार अबाधित राखण्यासाठी आवश्‍यक ती सर्व उपाययोजना करण्यास तयार आहे, असा इशारा चिनी परराष्ट्र मंत्रालयामधील प्रवक्‍ते जेंग शुआंग यांनी सांगितले. "भारत हा आता 1962 मधील नाही, हे जेटली यांचे मत बरोबरच आहे. मात्र चीनदेखील आता बदलला आहे. चीनदेखील 1962 मधील राहिलेला नाही,'' असे जेंग म्हणाले.

सिक्‍कीम सेक्‍टर येथील भारत व चीनमधील सीमारेषा 1890 च्या चीन-ब्रिटीश करारानुसार निश्‍चित करण्यात आली असल्याचा दावाही चीनकडून यावेळी करण्यात आला. यामुळे या कराराचा आदर भारताने चिनी हद्दीमधील लष्कर मागे घ्यावे, अशी मागणी चीनकडून यावेळी करण्यात आली.

Web Title: China is also different from 1962