चीनची राजकीय खेळी, स्वतःच्या नागरिकांपेक्षा जगाला कोरोना लस पुरवण्यासाठी खटपट

china
china

बिजिंग- जगभरात कोरोनाचा हाहाकार सुरुच आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाबाधित रुग्णांची कमी झालेली संख्या पुन्हा वाढू लागली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी अनेक कोरोना लशी बाजारात आल्या आहेत. असे असले तरी संपूर्ण लोकसंख्येला लस देण्यासाठी आणखी वेळ लागणार आहे. त्यामुळे आवश्यक ती खबरदारी घ्यावीच लागणार आहे. चीनमध्ये एकूण 16 स्वदेशी लशींच्या क्लिनिकल ट्रायलला मंजुरी मिळाली आहे. यातील 6 लशी ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यात आहेत.  चीनची सरकारी न्यूज एजेंसी शिन्हुआने यासंदर्भातील माहिती दिली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, चीनमध्ये 16 स्वदेशी लशींच्या क्लिनिकल ट्रायलला मंजुरी मिळाली आहे. शिवाय यातील 6 लशी ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचल्या आहेत. याआधी चीनने सरकारी कंपनी सिनोफार्म आणि सिनोवॅक बायोटेकने विकसित केलेल्या लशींच्या वापराला सशर्त मंजुरी दिली होती. 

जगाला कोरोना लस वाटतोय चीन

चीनने देशात लसीकरण मोहिम हाती घेतली आहे. पण आपल्या देशापेक्षा जगाला लस पुरवण्यासाठी चीन जास्त प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. चीनने प्राथमिकतेने जगातील अनेक देशांना लस पुरवण्याचे काम सुरु केले आहे. चीनने मोठ्या प्रमाणात लशींची निर्यात केली आहे. स्थानिक माध्यमाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. हाँगकाँगमधील वृत्तपत्र साऊन चायना मॉर्निंग पोस्टने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार चीनने आतापर्यंत 4.6 कोटी लशींचे डोस जगभरात पाठवले आहेत. चीनच्या या कृतीमागे राजनैतिक कारण आहे. 

चीन मोठ्या प्रमाणात लस इतर देशांना पाठवत आहे. दुसरीकडे देशाच्या आरोग्य विभागाने सांगितलंय की चीनने फेब्रुवारीपर्यंत 4.5 कोटी डोस आपल्या नागरिकांना दिले आहेत. अमेरिकेने आतापर्यंत 5 कोटी डोस आपल्या नागरिकांना दिले आहेत. चीनने मोठ्या प्रमाणात कोविड टेस्ट घेतल्या होत्या. मात्र, जानेवारीमध्ये चीन आपले लक्ष्य पूर्ण करु शकला नाही.

चीनमध्ये लसीकरणााची गती मंद

वृत्तपत्रानुसार, चीनने 2020 मध्ये 5 कोटी नागरिकांना लस देणार असल्याची घोषणा केली होती. पण, चीनला हे लक्ष्य गाठता आलेले नाही. लस घेण्यासाठी लोकांमध्ये असलेला निरुत्साह, लशींचा कमी पुरवठा आणि चीनच्या लशीचा कमी प्रभावीपणा यामागील कारण असल्याचं सांगितसं जातं. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com