भारतावर दबावासाठीच चीन-भूतान सीमावाद

Sakteng-Village
Sakteng-Village

जून २०२० मध्ये भूतानच्या पूर्व भागातील सेकतांग अभयारण्याच्या (६५० चौरस किलोमीटर) विकासाचे काम संयुक्त राष्ट्रांच्या विकास आणि ग्लोबल एन्व्हार्मेंट फॅसिलिटी (जीईएफ) यांच्या निधीतून सुरू असताना, हा वादग्रस्त भाग असल्याचा दावा करत चीनने काम थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो फेटाळला गेला. आजमितीला भारतासह चीनचा १८ देशांशी सीमाप्रश्नी वाद आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘जीईएफ''ने आपल्या ५८ व्या ऑनलाइन बैठकीत ‘सेकतांग’च्या निधीच्या चर्चेवेळी भूतानने चीनचा निषेध नोंदवत दावा कायम ठेवल्यानंतर तो मंजूर झाला. चीन-भूतान सीमावादावरील चर्चेत या भागाचा समावेश आहे, अशी चीनची भूमिका होती.

‘जीईएफ’ ही अमेरिकास्थित जागतिक संस्था असून, ती पर्यावरणविषयक प्रकल्पांना निधी देते. २०१८-१९ मध्ये ‘सेकतांग’मधील मृदसंधारणासाठी निधी मिळाला, त्यावेळी किंवा त्याआधी चीनने कधीही विरोध केलेला नाही, मग आताच कसा दावा करते, असा प्रश्न भूतानने केला आहे. भूतानने दिल्लीतील आपल्या दूतावासामार्फत चीनला हे कळवले आहे. 

काय आहे चीनचे पॅकेज व दावा?

  • भूतानच्या मध्य, पश्चिम भागाबाबतचा दावा चीन सोडून देईल, त्या बदल्यात भूतानने डोकलाम परिसरातील १०० चौरस किलोमीटर भाग चीनला वावरण्यासाठी खुला करून द्यावा. त्यामुळे चीनला भारताच्या सिलीगुडी कॉरिडॉरजवळ (चिकननेक) जाणे सोपे जाईल.  
  • भारताच्या सिलीगुडी कॉरिडॉरला डोळ्यासमोर ठेवून चीनने टॉरसो-अमो छू भागात रस्त्याचे काम सुरू केलेय. त्यांचा सातत्याने अरूणाचल प्रदेश आणि सिक्कीम या भारताच्या भूभागावर डोळा आहे.
  • भूतानचा त्रासिगांग जिल्हा भारत-चीन सीमेला लागूने, त्याच्याजवळ भारताचा पश्चिम कामेंग (अरूणाचल प्रदेश) आहे. भारताशी असलेल्या सीमावादासोबतच भूतानवर दबाव आणून भारतावर दबाव टाकण्याचा, भारतापासून भूतानला दुरावण्याचा हा प्रयत्न आहे.
  • चीन ज्या पूर्व भागावर दावा सांगतोय तेथे मध्ययुगीन काळापासून भूतानी लोकांचीच वस्ती आहे. 
  • चीन-भूतान यांच्यात रीतसर राजनैतिक संबंध नाहीत, १९८४ ते २०१६ या कालावधीत उभय देशांत सीमाप्रश्नाबाबत २४ बैठका झाल्या आहेत. 
  • भूतानचा उत्तर आणि मध्य भागातील जाकूरलंग आणि पासमलंग खोरे (४९५ चौरस किलोमीटर) आणि पश्चिम भागातील डोकलाम (२६९ चौरस किलोमीटर) यावरच प्रत्येक चर्चेत भर होता पूर्व भूतानबाबत आतापर्यंत कधीही चर्चा झालेली नाही.

भारत-भूतान मैत्री
भारत-भूतान यांच्यात १९४९ मध्ये मैत्री करार. त्यांच्या परराष्ट्र व्यवहार आणि संरक्षणविषयक बाबीत भारत त्यांना मार्गदर्शन करतो. त्यात २००७ मध्ये दुरूस्ती करून भूतानच्या सार्वभौमत्वाच्या जपणुकीवर भर दिला गेला. त्यानुसार भारत भूतानचे परकी आक्रमणापासून संरक्षणासाठी वचनबद्ध आहे. दोन्हीही देश एकमेकांच्या सार्वभौमत्वाला, संरक्षणाला आणि आपली भूमी एकमेकांविरुद्धच्या कारवायांना वापरू न देण्यास सर्वोच्च प्राधान्य देतात. अरूणाचल प्रदेशला (भारत) लागून भूतानमधील सेकतांग अभयारण्य आहे. भारत आणि भूतान यांनी २००६ मध्ये ६९९ किलोमीटर सीमावर्ती भागाची निश्चिती केली आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com