आई-वडीलांना मारलेल्या दोन दहशतवाद्यांचा या चिमुरडीने केला खातमा

यूएनआय
शुक्रवार, 24 जुलै 2020

हल्लेखोरांमध्ये पतीही सामील
न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार गुलचे वडील सरपंच तसेच सरकारचे समर्थक होते. सरकारला माहिती पुरविण्याचा संशय असलेल्या असंख्य नागरिकांना तालिबानकडून मारले जाते. गुलच्या बाबतीत कौटुंबिक कलह हे सुद्धा कारण होते आणि हल्लेखोरांमध्ये तिचा पतीही सामील होता. तिला बळजबरीने घेऊन जाण्यासाठी तो आल्याचे नातेवाइकांनी सांगितले.

घझ्नी (अफगाणिस्तान) - आई-वडीलांना मारलेल्या दोन तालिबान दहशतवाद्यांना यमसदनास धाडलेली अफगाणिस्तानची कमर गुल नामक चिमुरडी कौतुकाचा विषय ठरली आहे. आपल्यावर हल्ला केल्यास इतर कोणत्याही दहशतवाद्याचा पुन्हा मुकाबला करण्यास सज्ज असल्याचे तिने सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या आठवड्यात घोर या मध्य प्रांतातील टायवारा विभागातील एका दुर्गम खेड्यात गुलच्या घरावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. तिच्या डोळ्यादेखत आधी आईला आणि मग वडीलांना घरातून ओढून काढत बाहेर नेऊन गोळ्या घालण्यात आल्या. मग दहशतवादी पुन्हा घरात घुसण्याच्या प्रयत्नात असतानाच गुलने एके-47 रायफल हातात घेऊन दोन दहशतवाद्यांचा खातमा केला.

भारतातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग ब्राझीलपेक्षाही अधिक

ही घटना 16 जुलै रोजी घडली. चार दिवसांनी सरकारतर्फे माहिती देण्यात आली. आता गुल एका नातेवाईकाच्या घरी राहते. तिला संरक्षण पुरविण्यात आले आहे. हातात बंदूक घेतलेला तिचा फोटो व्हायरल झाला आहे. 

‘एएफपी़ वृत्तसंस्थेला दूरध्वनीवर दिलेल्या मुलाखतीत गुलने त्या मध्यरात्री घडलेल्या भीषण प्रसंगाबद्दल सांगितले की, वीटा अन्् चिखलापासून बनविलेल्या भिंतींच्या घराचा दरवाजा मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास कुणीतरी ठोठावत होते. थोड्याच वेळात दरवाजा तोडून दहशतवादी आत घुसले. आई त्यांना अडविणार तोच त्यांनी तिला बाहेर नेले. पाठोपाठ वडीलांनाही ओढून काढले. दोघांवर बेछूट गोळीबार करण्यात आला. मी भयंकर घाबरले होते, पण काही क्षणांत भीतीची जागा संतापाने घेतली. मी घरातील बंदूक हातात घेतली. दरवाजापाशी जाऊन दहशतवाद्यांवर गोळ्या झाडल्या. एक दहशतवादी गोळी झाडणार तोच माझा छोटा भाऊ पुढे सरसावला आणि त्याने माझ्याकडून बंदूक घेत गोळी झाडली. त्यामुळे तो दहशतवादी जखमी झाला. तो म्होरक्या असावा. त्यामुळे लगेचदहशतवाद्यांनी माघार घेतली.

आइनस्टाइन आणि चार्ली चॅप्लिन भेटल्यावर काय बोलले?

तोपर्यंत अनेक गावकरी आणि सरकारी सुरक्षा दलाचे जवानही दाखल झाले. त्यांच्याशी चकमक होऊन अखेर दहशतवादी पळून गेले.

दरम्यान, दहशतवादी मागे हटताच गुल आई-वडिलांपाशी गेली, पण तोपर्यंत त्यांचा श्वास थांबला होता. आई-वडिलांशी अंतिम क्षणी एकही शब्द बोलता आला नाही याचे तिला दुःख आहे, पण त्यांना मारलेल्या दहशतवाद्यांचा बळी घेतल्याचा तिला अभिमान वाटतो.

हल्लेखोरांमध्ये पतीही सामील
न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार गुलचे वडील सरपंच तसेच सरकारचे समर्थक होते. सरकारला माहिती पुरविण्याचा संशय असलेल्या असंख्य नागरिकांना तालिबानकडून मारले जाते. गुलच्या बाबतीत कौटुंबिक कलह हे सुद्धा कारण होते आणि हल्लेखोरांमध्ये तिचा पतीही सामील होता. तिला बळजबरीने घेऊन जाण्यासाठी तो आल्याचे नातेवाइकांनी सांगितले.

तालिबानचा इन्कार
टायवारा विभागात कारवाई झाल्याच्या वृत्तास तालिबान प्रवक्त्याने दुजोरा दिला, पण एका महिलेकडून कुणी दहशतवादी मारला गेल्याचा इन्कार केला.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: child killed two terrorists who killed their parents