आधी आग ओकणारा डुप्लिकेट सूर्य बनवला; आता चीनला लागलंय चंद्राच याडं

काही दिवसांपूर्वीच चीनच्या कृत्रीम सुर्याची जगभरात चर्चा झाली होती.
moon
moonTeam eSakal

चीनसाठी 21 व्या शतकातील 2021 हे वर्ष सर्वात यशस्वी वर्षांपैकी एक आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण चीनच्या अवकाश मोहिमेचा व्याप दिवसेंदिवस वाढतच जातोय. मागच्या काही दिवसांपूर्वीच चीनच्या (China) कृत्रीम सुर्याची (Artificial Sun) जगभरात चर्चा झाली होती. त्यानंतर देशाने आता एक कृत्रिम चंद्र (Artificial Moon) सुद्धा तयार करण्यासाठी योजना आखली आहे. ज्यामुळे नवीन तंत्रज्ञान आणि भविष्यातील मोहिमांची चाचणी घेण्यासाठी शास्त्रज्ञांना त्याचा उपयोग होणार आहे.

moon
UAE : अबुधाबीच्या नव्या विमानतळावर ड्रोन हल्ला!

जगातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न असल्याचं सांगण्यात येत आहे. जिआंगसू प्रांताच्या पूर्वेकडील शहरामध्ये एका ठिकाणी शुन्य गृत्वाकर्षणाची परिस्थिती तयार करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. ही सुविधा कमी गुरुत्वाकर्षणाच्या वातावरणाची प्रतिकृती बनवू शकते, ज्यामुळे अंतराळवीरांना प्रशिक्षण देण्यासाठी शून्य-गुरुत्वाकर्षणात रोव्हर्सची चाचणी घेण्यासाठी मदत होईल. या कामाचे नेतृत्व करणाऱ्या चायना युनिव्हर्सिटी ऑफ मायनिंग अँड टेक्नॉलॉजीचे ली रुइलिन यांनी साउथ चायना मॉर्निंग पोस्टला सांगितलं की, "विमानात किंवा ड्रॉप टॉवरमध्ये कमी गुरुत्वाकर्षण निर्माण करता येते, मात्र ते फक्त काही काळासाठी शक्य होतं. ली म्हणाले की, सिम्युलेटरच्यामाध्यमातून अशी परिस्थिती हवा तेवढा वेळ निर्माण करता येते.

moon
आता पाकिस्तानच पंतप्रधान खान यांना म्हणतोय, 'आंतरराष्ट्रीय भिकारी'

कृत्रिम पृष्ठभाग खडक आणि धूळ वापरून बनविला गेला आहे. जो चंद्राच्या पृष्ठभागाइतकाच हलका आहे. महत्वाची बाब म्हणजे, चंद्रावरील गुरुत्वाकर्षण शून्य नाही, ते चुंबकीय क्षेत्रामुळे पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणाच्या तुलनेत कमी आहे. ली पुढे म्हणाले, "इम्पॅक्ट टेस्ट सारख्या काही प्रयोगांना फक्त काही सेकंद लागतात, परंतु इतर क्रीप टेस्टिंगला बरेच दिवस लागू शकतात."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com