esakal | चीनमध्ये आनंदोत्सव; कुत्रा, वटवाघूळाच्या मांसासाठी गर्दी
sakal

बोलून बातमी शोधा

china celebrate victory and big crowds to buy dogs cats bat meat

चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. चीनने कोरोना व्हायरसवर विजय मिळविल्यानंतर आनंदोत्सव साजरा केला जात असून, नागरिकांनी कुत्रा, मांजर आणि वटवाघूळाच्या मांसासाठी गर्दी केल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

चीनमध्ये आनंदोत्सव; कुत्रा, वटवाघूळाच्या मांसासाठी गर्दी

sakal_logo
By
वृत्तसंस्था

बीजिंग (चीन): चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. चीनने कोरोना व्हायरसवर विजय मिळविल्यानंतर आनंदोत्सव साजरा केला जात असून, नागरिकांनी कुत्रा, मांजर आणि वटवाघूळाच्या मांसासाठी गर्दी केल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

जगातील पहिली घटना; अमेरिकेत कोरोनामुळे लहान बाळाचा मृत्यू

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, चीनमध्ये कोरोनावर विजय मिळविल्याबद्दल शनिवारी (ता. 28) आनंद साजरा करण्यात आला. यादरम्यान कुत्रा, मांजर, ससा, वटवाघूळ आणि बदकाच्या मांसाचे सेवन करण्यात आले. चीनच्या दक्षिण पश्चिम भागात गुइलिन परिसरात हजारो नागरिक मटन मार्केट पोहोचले आणि तेथे त्यांनी खुल्या अवस्थेच विक्री केले जाणारे मांस आणि जिवंत प्राणी खरेदी केली. या भागात शनिवारी लोकांची मोठी गर्दी जमा झाली होती. येथे कुत्रा, मांजरीचे मांस विकले जात होते. कोरोनाचे संकट संपल्याचे येथील नागरिकांना वाटत आहे.

ब्रिटनमध्ये जूनपर्यंत लांबणार संचारबंदी!

चीनमध्ये ससा आणि बदकाचे मांस खाऊन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शिवाय, वटवाघळाची जोरदार विक्री सुरू झाली आहे. चीनमधील वुहान शहरातून कोरोना व्हायरस जगभरात पसरला होता. पॅंगोलिनकडून वटवाघूळाच्या माध्यमातून कोरोना व्हायरसने माणसांच्या शरीरात प्रवेश केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चीनमधून पसरलेल्या या व्हायरसमुळे जगभरातील 34 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. शिवाय आतापर्यंत 7,23,434 जणांना संसर्ग झाला आहे.

स्पेनमध्ये 24 तासांत सर्वाधिक मृत्यू; लॉकडाऊनचे नियम बदलले