'तो तर भाग आमचा' ;अरुणाचल प्रदेशातून ५ भारतीयांचे अपहरण केल्यानंतर चीनची प्रतिक्रिया

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 7 September 2020

भारताच्या अरुणाचल प्रदेशातून ५ भारतीयांचे अपहरण करणारा चीन दादागिरी करताना दिसत आहे.

बिजिंग- भारताच्या अरुणाचल प्रदेशातून ५ भारतीयांचे अपहरण करणारा चीन दादागिरी करताना दिसत आहे. ५ भारतीयांच्या अपहरणाबाबत भारताने चीनला जाब विचारले होते. यावर उत्तर देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता झाओ लिजिन म्हणालेत की, भारता ज्या गोष्टीची विचारणा करत आहे, त्याबद्दल आम्हाला काही माहिती नाही. मात्र, अरुणाचल प्रदेश हा आमचा भाग आहे. 

चीनने कधीधी अरुणाचल प्रदेशला मान्यता दिली नाही. कारण तो चीनच्या दक्षिण तिबेटचा भाग आहे. भारताने पिपल्स लिबरेशन आर्मीवर ५ भारतीयांना सोडण्याचे आवाहन केले आहे. मात्र, आमच्याकडे याबाबतची कोणतीही माहिती उपलब्ध नाही, असं ते म्हणाले आहेत. अरुणाचल प्रदेशमधून ५ भारतीय नागरिक बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसाची टीम मॅकमोहन रेषेला लागून असलेल्या सीमाभागात पाठवण्यात आली आहे. ही रेषा सुबनसिरी जिल्ह्याला तिबेटपासून वेगळे करते.

हाँगकाँग पोलिसांची क्रुरता; 12 वर्षाच्या मुलीविरोधात बळाचा वापर केल्याचा...

चीनच्या पीएलएने केले अपहरण

चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने भारतीय जवानांना गायब केल्याचं कळत आहे. हे तरुण भारतीय जवानांना सामान पुरवण्याचं काम करायचे. ५ तरुण जंगलच्या दिशेने गेले होते, त्यानंतर चीनच्या जवानांनी त्यांचे अपहरण केले असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. बेपत्ता तरुणांपैकी एकाच्या भावाने फेसबुकवर पोस्ट केली होती. यात त्याने भारतीय सेनेच्या सेरा- ७ पेट्रोलिंग भागातून चीनच्या सैनिकांनी पाच जणांचे अपहरण केले असल्याचे लिहिले होते. ही जागा दापोर्जिया जिल्हा मुख्यालयापासून १२० किलोमीटर अंतरावर आहे. 

फेसबुक पोस्टनंतर जिल्हा प्रशासन सतर्क झाले. नाचो गाव सेरा-७ पासून १२ किलोमीटर अंतरावर आहे. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे तरुण वाहकाच्या स्वरुपात भारतीय सैनिकांसोबत जुडले गेले होते. शिवाय येथे मोबाईल नेटवर्क किंवा सिग्नल नसल्याने गाईडच्या स्वरुपात काम करायचे. गुरुवारी हे तरुण सीमा भागात गेल्याचे कळत आहे. 

माजी मंत्री निगॉन्ग एरिंग यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली. वाहकाच्या स्वरुपात काम करणे येथील लोकांसाठी सर्वसामान्य बाब आहे. भारतीय सैन्याला काही सामान पुरवल्यानंतर हे तरुण जंगलात शिकारीला किंवा काही वनस्पती गोळा करण्यासाठी गेले असतील. तेव्हा त्यांचे अपहरन करण्यात आल्याचं ते म्हणाले आहेत. टोच सिंगकम, प्रसात रिंगलिंग, डोंगटू एबिया, तनु बाकेर आणि गारु डिरी असं बेपत्ता तरुणांची नावे आहेत.

(edited by- kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: china claim arunachal pradesh is their teritory china india faceoff