भारतीय सैन्याने आमच्या हद्दीत घुसून गोळीबार केला; चीनचा दावा

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 8 September 2020

जर हा दावा खरा असेल तर 1975 नंतर पहिल्यांदाच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत-चीन यांच्यातील गोळीबाराची ही पहिलीच घटना ठरेल. 15 जून रोजी गलवान खोऱ्यात दोन्ही सैन्यात हिंसक झडप झाली होती. मात्र तरी देखील दोन्ही देशातील सैन्यात गोळीबारीची घटना घडली नव्हती.

भारत-चीन यांच्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर मागील काही महिन्यांपासून तणावपपूर्ण वातावरण आहे. चीनच्या कुरापती रोखण्यासाठी भारताने सीमारेषेवर अतिरिक्त सैन्यही तैनात केले आहे. सोमवारी दोन्ही देशातील सैन्यांमध्ये गोळीबार झाल्याचे वृत्त समोर येत आहे. चर्चेतून तोडगा काढण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देऊन भारतात घुसखोरी करणाऱ्या चीनने आता भारतावर आरोप केला आहे. भारतीय सैन्याने चीनच्या हद्दीत घुसून गोळीबार केल्याचा दावा चिनी सैन्याने केलाय.  पँगाँग तलाव परिसराच्या दक्षिण भागात भारतीय सैन्याकडून गोळीबार करण्यात आल्याचे चीनने म्हटले आहे. चीनच्या या दाव्यावर भारत सरकारने अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही. चिनी सैन्याने जारी केलेल्या निवेदनात सैनिक जखमी किंवा मृत झाल्याचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही.  

ईडीची मोठी कारवाई; चंदा कोचर यांच्या पतीला अटक

 जर हा दावा खरा असेल तर 1975 नंतर पहिल्यांदाच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत-चीन यांच्यातील गोळीबाराची ही पहिलीच घटना ठरेल. 15 जून रोजी गलवान खोऱ्यात दोन्ही सैन्यात हिंसक झडप झाली होती. मात्र तरी देखील दोन्ही देशातील सैन्यात गोळीबारीची घटना घडली नव्हती. भारत सीमारेषेवर कोणत्याही प्रकारचे उल्लंघन करत नाही. चिनी सैन्यच भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत आहे, असा दावा यापूर्वी भारताने अनेकवेळा केलाय. दोन्ही राष्ट्रांत शांतीच्या मार्गाने तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु असताना चिनी सैन्याकडून सीमारेषेवरील कुरापती सुरु असल्याच्या काही बातम्या यापूर्वी समोर आल्या होत्या.  

भाजपचा आयटी सेल बदमाश; स्वामींनी दिला घरचा आहेर

चीनचे सरकारी वृत्तपत्र असणाऱ्या  'ग्लोबल टाइम्स'ने चिनी सैन्य अधिकाऱ्याचा हवाला देत भारतीय सैन्याकडून गोळीबार करण्यात आल्याचे वृत्त दिले आङे. 'भारतीय सेनाने सीमा उल्लंघनकरुन अनाधिकृतरित्या शेनपाओ खोऱ्यातील  पँगाँग तलावाच्या दक्षिण किनाऱ्यावरील परिसरात गस्त घालणाऱ्या चिनी सैन्याच्या तुकडीच्या दिशेने गोळीबार केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी चिनी सैन्याकाला गोळीबार करावा लागला, असे ट्विट ग्लोबल टाइम्सने अधिकृत ट्विट अकाउंटवरुन केले आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: China claims Indian troops crosses LAC and fired warning shots