चीनने केली हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी; अमेरिकेकडेही नाही रोखण्याची क्षमता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चीनने केली हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी; अमेरिकेकडेही नाही रोखण्याची क्षमता

चीनने केली हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी; अमेरिकेकडेही नाही रोखण्याची क्षमता

sakal_logo
By
टीम ई सकाळ

बीजिंग : भूतानच्या हद्दीत गावाची उभारणी करत भारत सीमेवर तणाव निर्माण करणाऱ्या चीनने हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची दुसऱ्यांदा चाचणी केली. अण्वस्त्र डागण्यास सुपरसॉनिक क्षेपणास्त्र सक्षम असल्याचे सूत्राने सांगितले आहे. एवढेच नाही तर हे क्षेपणास्त्र पृथ्वीवरून कोणत्याही हवाई संरक्षण यंत्रणेला भेदू शकते. चीनच्या सुपरसॉनिक क्षेपणास्त्राला रोखण्याची क्षमता अमेरिकेसह कोणत्याच देशाकडे नसल्याचे सूत्राचे म्हणणे आहे.

हेही वाचा: काँग्रेसकडून उद्या देशभरात 'किसान विजय दिवस', कार्यक्रमांचं आयोजन

चीनने सुपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी तीन महिन्यापूर्वी १३ ऑगस्ट रोजी केल्याचे सांगितले जात आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या चाचणीतही ‘हायपरसॉनिक ग्लाइड व्हेईकल’ चा वापर करण्यात आला आहे. यास चीनने लॉंग मार्च रॉकेटच्या मदतीने अंतराळात पाठवले होते. या क्षेपणास्त्राने पृथ्वीला प्रदक्षिणा घातली आणि निश्‍चित केलेल्या स्थानावर आवाजापेक्षा अधिक वेगाने हल्ला केला. या चाचणीला चीनने दुजोरा दिला आहे. परंतु हे क्षेपणास्त्र ‘सिव्हिलियन स्पेसक्राफ्ट’ असल्याचा दावा चीनने केला आहे. दुसरीकडे जगभरातील तज्ञांनी या चाचणीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

हेही वाचा: बलात्काऱ्यांना नपुसंक करणं इस्लामविरोधी; पाकने हटवली कायद्यातील तरतूद

या क्षेपणास्त्रातून अण्वस्त्र वहन करता येऊ शकते आणि कोणतीही भक्कम संरक्षण यंत्रणा देखील भेदण्यास सक्षम आहे. चीनच्या या अंतराळ क्षेपणास्त्राची क्षमता जाणून घेण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्नशील आहेत. या क्षेपणास्त्राने भौतिकशास्त्राचे अनेक नियम बदलले असून अशा प्रकारचे तंत्रज्ञान अमेरिकेकडेही नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, चीनच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत व्हाइट हाऊसने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच या चाचणीलाही दुजोराही दिला नाही.

loading image
go to top