गुड न्यूज : कोरोना लसीची चाचणी माकडावर यशस्वी

यूएनआय
रविवार, 10 मे 2020

जगरातील अनेक देश आणि संशोधक कोरोनाविषाणूवर लस शोधण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. आता चीनच्या संशोधकांनी कोरोनाच्या लशीची चाचणी माकडांवर यशस्वी झाल्याचे म्हटले आहे. सध्या अनेक देशांमध्ये सुरू असलेल्या लस शोधण्याच्या स्पर्धेत चीनने आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

जगरातील अनेक देश आणि संशोधक कोरोनाविषाणूवर लस शोधण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. आता चीनच्या संशोधकांनी कोरोनाच्या लशीची चाचणी माकडांवर यशस्वी झाल्याचे म्हटले आहे. सध्या अनेक देशांमध्ये सुरू असलेल्या लस शोधण्याच्या स्पर्धेत चीनने आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मकाऊ माकडांवर चाचणी  
बीजिंगस्थित सायनोव्हॅक बायोटेककडून हे संशोधन सुरू आहे. पीकोव्हॅक असे या लसीचे नाव आहे. निष्क्रिय केलेल्या विषाणूच्या अंशापासून ही लस बनविण्यात येत आहे. भारतातून जगभरात गेलेल्या रिसस मकाऊ या माकडांवर लसीची चाचणी घेण्यात आली. यातून समाधानकारक निष्कर्ष हाती आले. 

कशी झाली चाचणी? 
संशोधकांनी चाचणीदरम्यान प्रथम लस देण्यात आली. नंतर त्यांना कोरोनाविषाणूच्या संपर्कात आणण्यात आले. लसीमुळे माकडांच्या रोगप्रतिकारक शक्तीचा प्रतिसाद वाढून  त्यांच्या शरीरात तयार झालेल्या अँडीबॉडीज कोरोनासह इतर विषाणूंवरही हल्ला करीत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतेय तरीही पाक सरकारने लॉकडाउन हटविला; 'हे' आहे महत्त्वाचं कारण!

लस न दिलेल्यांना न्यूमोनिया 
पीकोव्हॅक लस दिलेल्या माकडांच्या फुफ्फुस्सामध्ये आठवड्यानंतरही कोरोना विषाणू आढळून आला नाही. तसेच, लस न दिलेल्या माकडांना तीव्र न्यूमोनिया झाल्याचे निदर्शनास आले. 

इतर चाचण्या सुरू 
चीनमध्ये एप्रिलच्या मध्यापासून लसीची मानवावर चाचणी सुरू झाल्याचे वृत्त आहे. ‘चायनीज मिलिटरी इन्स्टिट्यूशन’ने आणखी एक लस तयार केली असून, तिची मानवावर चाचणी सुरू आहे. याचबरोबर इस्राईल आणि इटली यांनी कोरोनावर लस यशस्वीपणे शोधल्याचा दावा केला आहे. 

चाचणीला रुग्ण मिळणार नाहीत 
चीनमध्ये आगामी काळात कोरोनावरील लसीच्या चाचणीसाठी भविष्यात कोरोनाचा रुग्ण मिळण्यात अडचणी येणार आहेत. कारण चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस कमी होत आहेत. अशीच परिस्थिती २००३ मध्ये चीनमध्ये सार्सवर लस शोधताना निर्माण 
झाली होती अशी माहिती शास्त्रज्ञांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: China conducts first successful covid 19 vaccine test on monkeys