
चीन आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढत चालला आहे. चीनने अमेरिकेला थेट धमकी दिली आहे.
बीजिंगः चीन आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढत चालला आहे. चीनने अमेरिकेला थेट धमकी दिली असून अमेरिकेविरोधातल्या कोणत्याही युद्धासाठी आम्ही सज्ज असल्याचे चीनने म्हटले आहे. तयारीचे पाऊल म्हणून चीनने युद्धसराव केला असून चीनच्या पाणबुडी नष्ट करणा-या विमानांनी दक्षिण चीन समुद्रात आपली गस्तही वाढविली आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
चिनी सैन्य दक्षिण चीन समुद्रात आक्रमकपणे वागत असल्याचा अमेरिकेनं आरोप केला आहे, तर डोनाल्ड ट्रम्प प्रशासन अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण भडकवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा चीनचा आरोप आहे. वाढत्या ताणतणावाच्या परिस्थितीतच चिनी युद्धनौकांनी दक्षिण चिनी समुद्रात युद्धाचा सराव केला आहे. त्याचदरम्यान, अमेरिकेने अलास्कामध्ये एफ-३५ लढाऊ विमानांना युद्धासाठी तयार राहण्याचे संकेत दिले आहेत.
धक्कादायक ! गॅस गळतीमुळे ७ जणांचा मृत्यू तर, ५०००हून अधिकांची प्रकृती गंभीर
अमेरिकेबरोबर युद्धाची वेळ आल्यास चीनने आपल्या तयारीला वेग दिला आहे. चिनी विमानवाहू जहाजं, युद्धनौका आणि लढाऊ विमानांनी थेट युद्धसराव सुरू केला आहे. चिनी सैन्याने म्हटले आहे की. ते अमेरिकेविरोधातल्या कोणत्याही युद्धासाठी सज्ज आहोत. एवढेच नाही तर चीनच्या पाणबुडी नष्ट करणा-या विमानांनी दक्षिण चीन समुद्रात आपली गस्तही वाढविली आहे. अमेरिका या भागात सतत आपले सैन्य जहाज पाठवत असताना चीनने हे पाऊल उचलले आहे. अमेरिकेचे पाळत ठेवणारी विमानेही या भागास नियमित भेट देत आहेत.
दिलासादायक ! लॉकडाऊनमध्ये 'या' कार निर्माता कंपनीने घेतला मोठा निर्णय
चीनबरोबर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे संरक्षण मंत्री मार्क एस्पर यांनी मंगळवारी सांगितले की, चीनचं सैन्य दक्षिण चिनी समुद्रात आक्रमक भूमिका घेत आहे. कोरोना विषाणू पसरवल्याचा त्यांच्यावर झालेल्या आरोपांवरून लक्ष विचलित करण्यासाठी आणि आपली प्रतिमा सुधारण्यासाठी चुकीची माहिती पसरवण्याचं अभियान चालवत आहे. दक्षिण चिनी समुद्रात पीपल्स लिबरेशन आर्मीचा आक्रमक पवित्राचिनी कम्युनिस्ट पक्षाने या आरोपांवरून लक्ष विचलित करण्यासाठी आणि आपली प्रतिमा सुधारण्यासाठी चुकीची माहिती पसरवण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे, असं एस्पर यांनी पेंटागॉन येथे पत्रकार परिषदेत सांगितले.