...म्हणून आम्ही गलवान खोऱ्यातून माघार घेतोय; चीनने दिली कबुली

china conforms disengagement along LAC after reports of moving back troops
china conforms disengagement along LAC after reports of moving back troops

बिजिंग- भारत आणि चीनदरम्यान लष्करी स्तरावर झालेल्या दीर्घ चर्चेनंतर दोन्ही देशांनी गलवान खोऱ्यातील आपल्या सैनिकांना प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून माघारी घेतले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने या बातमीची पुष्टी केली आहे. भारतासोबत निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी आम्ही आमचे सैन्य मागे घेत आहोत, असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेला वाद निवळण्याची शक्यता आहे.

मोदींच्या या 3 अपयशांचा हार्वर्ड स्कूलमध्ये अभ्यास होईल; राहुल गांधींचा टोला
चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने( पीएलआय) गलवान खोऱ्यातून कमीतकमी एक किलोमीटरपर्यंत माघार घेतली असल्याची माहिती दिली जात होती. त्यानंतर चीनकडून या बातमीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. भारतानेही आपले सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून मागे घेतले आहे. त्यामुळे दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये एक बफर झोन तयार झाला आहे. त्यामुळे भारताच्या आक्रमकतेचा विजय झाला असल्याचं सध्याचं तरी चित्र आहे.

5 मे रोजी चीनच्या सैनिकांनी भारताच्या हद्दीत घुसखोरी केली होती. त्यावेळी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झडप झाली होती. तेव्हापासून चीनचे सैन्य सीमा रेषेवर तैनात होते. त्यांनी या भागात कृत्रिम बांधकाम आणि तंबू ठोकले होते. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला होता. त्यातच 15 जून रोजी उभय देशांच्या सैनिकामध्ये झालेल्या संघर्षाला हिंसक वळण लागले होते. त्यात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध अत्यंत स्फोटक बनले होते. दोन्ही देशांनी सीमा भागात आपापले सैनिक तैनात केले होते. दुसरीकडे लष्करी स्तरावर चर्चाही सुरु होत्या.

चीनला धडा शिकवण्यासाठी भारताकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला. 59 चिनी अॅप्सवर भारत सरकारकडून बंदी आणण्यात आली. तसेच चिनी कंपन्यांच्या भारतातील गुंतवणुकीवर निर्बंध आणण्यात आले होते. त्यामुळे सैन्य मागे घेण्यासाठी चीनवर दबाव वाढला होता. तसेच भारताने चीनविरोधात आंतरराष्ट्रीय आघाडी उघडण्याचे प्रयत्न सुरु केले होते. 

प्रियांका गांधी यांचा सरकारी बंगला भाजप आयटी सेल प्रमुखाला मिळणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन दिवसांपूर्वी लडाखला अचानक भेट दिली होती. त्यानंतर चीन मागे हटल्याची माहिती आली आहे. मोदींनी लडाखमध्ये भारतीय जवानांना संबोधित करताना नाव न घेता चीनला सज्जड दम दिला होता. विस्तारवादाचे युग आता संपले आहे, हे विकासाचे युग आहे. इतिहास साक्ष आहे, विस्तारवादाने मानवजातीचा विनाशच केला आहे. त्यामुळे विस्तारवाद सोडून सर्वांनी शांततेसाठी प्रयत्न करायला हवेत, असं म्हणत मोदींनी इशारा दिला होता.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com