esakal | चीन अन्य देशांमध्ये लष्करी साहित्याची ने-आण करण्यासाठी केंद्रे उभारण्याच्या विचारात
sakal

बोलून बातमी शोधा

Dragon

चीन आता अन्य देशांमध्ये लष्करी साहित्याची ने-आण करण्यासाठी वेगळी केंद्रे उभारण्याच्या विचारात आहे. भारताच्या शेजारी देशांमध्ये  ड्रॅगनच्या या कुरापती सुरू असल्याने  गुप्तचर यंत्रणा सावध झाली आहे. चीनला जगात अन्य ठिकाणी पाय रोवायचे असून तेथून त्यांना अन्यत्र मारा करण्याची क्षमता वाढवायची असल्याचे अमेरिकी संरक्षण मंत्रालयाचे मत आहे.

चीन अन्य देशांमध्ये लष्करी साहित्याची ने-आण करण्यासाठी केंद्रे उभारण्याच्या विचारात

sakal_logo
By
पीटीआय

वॉशिंग्टन - चीन आता अन्य देशांमध्ये लष्करी साहित्याची ने-आण करण्यासाठी वेगळी केंद्रे उभारण्याच्या विचारात आहे. भारताच्या शेजारी देशांमध्ये  ड्रॅगनच्या या कुरापती सुरू असल्याने  गुप्तचर यंत्रणा सावध झाली आहे. चीनला जगात अन्य ठिकाणी पाय रोवायचे असून तेथून त्यांना अन्यत्र मारा करण्याची क्षमता वाढवायची असल्याचे अमेरिकी संरक्षण मंत्रालयाचे मत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारताचे शेजारी असणाऱ्या पाकिस्तान, श्रीलंका आणि म्यानमार या देशांमध्ये चीनने लष्करी साहित्यांची ने-आण करण्याची क्षमता असणारी तळे आणि पायाभूत सुविधा यांच्या उभारणीवर लक्ष केंद्रित केले आहे. या तीन देशांबरोबरच थायलंड, सिंगापूर, इंडोनेशिया, संयुक्त अरब अमिराती (यूएई), केनिया, सेशेल्स, टांझानिया, अंगोला आणि ताजिकिस्तान या देशांमध्येही चीन  हातपाय पसरू पाहत आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय पेंटागॉनने त्यांच्या काँग्रेससमोर लष्करी आणि सुरक्षाविषयक घडामोडींच्या अनुषंगाने वार्षिक अहवाल सादर केला असून त्यामध्ये चीनचे लष्कर पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाच्या चिथावणीखोर कारवायांचा उल्लेख करण्यात आला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अमेरिकेला शह?
चीनच्या लष्कराने जिबूती भागामध्ये या आधीच लष्करी तळाची उभारणी केली आहे. या भागातून नौदल, हवाई दल आणि लष्कराला पाठबळ देण्याचा त्यांचा विचार आहे. या तळांमुळे चीनला अमेरिकेच्या लष्करी कारवाया आणि युद्धसरावामध्ये हस्तक्षेप करण्याची संधी मिळणार आहे. नामिबिया, वंतावू आणि सोलोमन बेटांवर चीनने या आधीच धडक दिली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीपर्यंत जाण्याची चीनची तयारी आहे. वन बेल्ट, वन रोड हा प्रकल्प वरकरणी अर्थकारण असले तरीदेखील त्यामागेही चीनची लष्करी रणनीती दडली असल्याचे बोलले जाते.

Edited By - Prashant Patil