चीनमध्ये पुन्हा कोरोना लाटेचा धोका; 5 लाख नागरिकांच्या आयुष्यावर परिणाम

china bejing
china bejing

नवी दिल्ली - जगभरात कोरोना व्हायरस जिथून पसरला त्या चीनमधील वुहान शहरात पुन्हा प्रादुर्भाव वाढायला लागला आहे. चीनमध्ये आता कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. मात्र चीन पुन्हा कोरोनाचा हा टप्पा आणि यातले धोके लपवण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या कोरोनामुळे पेइचिंगमध्ये जवळपास 5 लाख लोक होम क्वारंटाइन आहे. चीन सरकारने या भागातील लोकांना इशारा दिला आहे की, आजुबाजुच्या भागात कोरोनाच्या प्रादुर्भावाची परिस्थिती गंभीर आहे. पेइचिंगपासून 150 किमी दूर असलेल्या अंशिन काउंटीला पूर्णपणे सील करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 

चीनमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात आरोग्य अधिकाऱ्यांना तपासणीदरम्यान अनेक नवीन क्लस्टर बघायला मिळत आहेत. असंही सांगितलं जात आहे की, कोरोना व्हायरसची अशी परिस्थिती वुहानमध्येही आढळली आहे. प्रादुर्भावाच्या या दुसऱ्या टप्प्यात चीनमध्ये आतापर्यंत 311 नवीन प्रकरणे आढळली आहेत. तसंच अधिकाऱ्यांच्या मते पेइचिंगमध्ये कोरोनाला रोखण्यासाठी दुसऱ्या टप्प्याचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय बाजार आणि सार्वजनिक वाहतुक व्यवस्थाही बंद ठेवण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने तयार केलेल्या नियमांनुसार पेइचिंगच्या बाहेर जाणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला गेल्या 7 दिवसांमध्ये करण्यात आलेल्या कोरोना व्हायरसच्या टेस्टचा रिपोर्ट दाखवणं बंधनकारक आहे.

ड्रॅगन बोट फेस्टिव्हलचे आयोजन चीनमध्ये करण्यात आलं होतं. या तीन दिवसांच्या फेस्टिव्हलचा समारोप शनिवारी झाला. यावेळी लाखो चीनी लोकांना या फेस्टिव्हलमध्ये सहभाग घेतला होता. मात्र यानंतर प्रादुर्भाव झाल्याची कोणती माहिती समोर आलेली नाही. मात्र चीनमध्ये दुसऱ्या टप्प्यात एक भीतीचं वातावरण तयार झालं. यामुळे वुहानमध्ये कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं होतं. 

चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार बिजिंग सीडीसीतील संशोधकांनी म्हटलं की, पेइचिंगमधील बाजारात क्लस्टर प्रादुर्भाव झालेल्या कोरोना व्हायरसच्या जिनोम सिक्वेंसिंगवरून अशी माहिती मिळाली की तो युरोपमधून आला आहे. संशोधकांना दावा केला की हा प्रादुर्भाव चीनच्या बाहेरून आलेल्या व्हायरसमुळे होत आहे. 

जगातील अनेक देशांना कोरोना व्हायरसचा फटका बसला. अमेरिकेत कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. ज्या चीनमधून जगात कोरोना पसरला त्या आकडेवारीबाबत मात्र शंका व्यक्त केली जात आहे. चीनमध्ये एकूण कोरोनाचे 83 हजार 512 रुग्ण आढळले. त्यापैकी 4634 जणांचा मृत्यू झाला. तर 78460 जण बरे होऊन घरी परतले. सध्या चीनमध्ये 418 कोरोनाचे रुग्ण आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com