...आता या देशाने उठविले देशातील पूर्ण लॉकडाउन

यूएनआय
सोमवार, 29 जून 2020

सामूहिक संसर्ग नसल्यामुळे रविवारी देशव्यापी लॉकडाउन संपूर्णपणे उठवीत असल्याचे श्रीलंका सरकारने जाहीर केले. अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्या कार्यालयाकडून तसे निवेदन जारी करण्यात आले. २० मार्च रोजी लॉकडाउनचे निर्बंध लागू करण्यात आले होते. महिन्यापूर्वी रुग्णांची संख्या वाढल्यामुळे निवडक संचारबंदी लागू करण्यात आली होती.

कोलंबो - सामूहिक संसर्ग नसल्यामुळे रविवारी देशव्यापी लॉकडाउन संपूर्णपणे उठवीत असल्याचे श्रीलंका सरकारने जाहीर केले. अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्या कार्यालयाकडून तसे निवेदन जारी करण्यात आले. २० मार्च रोजी लॉकडाउनचे निर्बंध लागू करण्यात आले होते. महिन्यापूर्वी रुग्णांची संख्या वाढल्यामुळे निवडक संचारबंदी लागू करण्यात आली होती. आता रात्रीच्या वेळेतील संचारबंदी कायम असेल. नौदलाच्या वेलीसारा येथील तळावर संसर्ग पसरला होता; पण तेथील परिस्थिती आटोक्‍यात आणण्यात आली. तो भाग लॉकडाउनमध्ये आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

श्रीलंकेत ऑगस्टच्या प्रारंभी संसदीय निवडणूकही घेण्याचे नियोजन आहे. सरकारच्या माहितीनुसार दक्षिण आशियातील या देशात सुमारे दोन हजार रुग्ण आणि ११ बळी अशी कोरोनाची आकडेवारी आहे.

‘जी७’ समूहात या देशाचा समावेश करण्यास जपानने दर्शविला विरोध

श्रीलंकेने देशातील आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानसेवा १ ऑगस्ट रोजी खुली करणार असल्याचे म्हटले होते. मात्र, त्याला विलंब होऊ शकतो, असे सरकारने नव्याने जाहीर केले आहे.

समलिंगी कामगारांना न्यायालयाचे संरक्षण

दरम्यान, आंतरराष्ट्रीय प्रवास एक ऑगस्टपासून सुरू करण्यात येईल, असे ठरले होते; पण त्याबाबत आढावा घेण्यात येईल. परदेशातून आलेल्या व्यक्तींना संसर्ग होण्याचे प्रमाण किती याचा आढावा घेण्यात येईल. विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष निवृत्त मेजर जनरल जी. ए. चंद्रसिरी यांनी सांगितले की, आत्तापर्यंत १२ हजार नागरिक परतले असून, ४० हजार नागरिक अद्यापही विविध देशांत अडकले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now this country has raised a complete lockdown in the country