‘जी७’ समूहात या देशाचा समावेश करण्यास जपानने दर्शविला विरोध

यूएनआय
सोमवार, 29 जून 2020

रशियालाही विरोध
रशियाचा समावेश करावा या ट्रम्प यांच्या सूचनेला कॅनडा आणि युरोपीय महासंघानेही विरोध दर्शविला होता. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडेयू यांनी तसे तातडीने जाहीरपणे सांगितले होते.

टोकियो - दक्षिण कोरियाचा ‘जी७’ समूहात समावेश करण्यास जपानने विरोध दर्शविला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तशी सूचना केली होती. ‘क्‍योदो’ या जपानी वृत्तसंस्थेने राजनैतिक सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘जी७’ समूहात अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जपान, जर्मनी, इटली आणि कॅनडा यांचा समावेश आहे. युरोपीय महासंघाचे प्रतिनिधीही परिषदांना उपस्थित असतात; मात्र हा समूह आता कालबाह्य झाला आहे. त्यात रशिया, दक्षिण कोरिया, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश करावा, असे ट्रम्प यांनी गेल्या महिन्याच्या अखेरीस म्हटले होते.

कोरोना रुग्णांची संख्या १ कोटीवर; तर मृत्यूची संख्या...

त्यानंतर जपानकडून लगेचच त्यांना हे मत कळविण्यात आले. उत्तर कोरिया आणि चीन यांच्याबाबत दक्षिण कोरियाची भूमिका ‘जी७’ समूहाशी मिळतीजुळती नाही, असे जपानने कळविले. 

हे मत सार्वजनिक पातळीवर मात्र जाहीर करण्यात आले नाही, याचे कारण ‘जी७’चे विस्तारीकरण हा ट्रम्प यांचा केवळ विचार आहे, जो काळाच्या ओघात मागे पडेल असे जपानला वाटते.

प्रत्येक रविवारी होणार लॉकडाऊन; राज्य सरकारचा मोठा निर्णय

या महिन्याच्या प्रारंभी जपानचे प्रमुख सरकारी प्रवक्ते योशिहीदे सुगा यांनी सांगितले होते की, ‘जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ‘जी७’ ही एक महत्त्वाची चौकट आहे.’ विस्तारीकरणाबाबत अमेरिकेने जपानला काही माहिती दिली आहे का, या प्रश्‍नावर त्यांनी स्पष्ट केले होते की, ‘मी तपशीलाबाबत भाष्य करणार नाही; पण उभय देशांत सखोल संवाद सुरू आहे.’

संसर्ग वाढल्यास पुन्हा लॉकडाउन - उद्धव ठाकरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Japan opposes inclusion in G7 for specific country