कोरोनाचं थैमान; मृतांचा आकडा 800वर, 'सार्स'च्या एकूण बळींना टाकलं मागे

टीम ई-सकाळ
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

बीजिंग : चीनमध्ये फैलावलेल्या कोरोना व्हायरसमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा 803वर गेला आहे. त्यामुळं ही जगातील आजवरची सर्वांत मोठी रोगराई असल्याचं बोललं जाऊ लागलंय. जवळपास 17 वर्षांपूर्वी चीनमध्येच सार्स नावाच्या रोगानं थैमान घातलं होतं. त्यातील जगभरातील एकूण मृतांच्या संख्येला कोरोनानं मागं टाकलंय.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चीनमधील हुबेई प्रांतात कोरोना व्हायरसची सर्वांत मोठी लागण झाली आहे. जवळपास 37 हजार लोकांना कोरोना व्हायरसनं गाठलं आहे. त्यांच्या जीविताला धोका आहे. आजवर या व्हायरसने 803 जणांचा बळी घेतल्याची माहिती मिळाली आहे. रविवारी या रोगानं आणखी 81 जणांचा बळी घेतला  आहे. त्यामुळं मृतांचा आकडा 800च्या वर गेला आहे. चीनमध्ये 2002-03मध्ये सार्स या रोगानं थैमान घातलं होतं. त्यातील बळींची संख्या 774 होती. आता कोरोनाच्या बळींची संख्या त्याच्याही पुढं गेली आहे. विशेष म्हणजे, अजूनही कोरोनावर लस शोधण्यास वैद्यकीय क्षेत्रातील शास्त्रज्ञांना अपयश आलंय. 

आणखी वाचा - धक्कादायक:कोरोनाग्रस्तांना दिलं जातंय कासवाचं मांस

आणखी वाचा - चीनमध्ये कोरोनाग्रस्तांची धरपकड, परिस्थिती हाताबाहेर

या संदर्भात चीनच्या हुबेई प्रांतातील आरोग्य परिषदेने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 2 हजार 147 जणांना कोरोनाची नव्यानं लागण झालीय. त्यामुळं कोरोनाग्रस्तांचा आकडा 37 हजारांवर पोहोचला आहे. या रुग्णांवर वुहान शहरासह राज्यातील अनेक खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. चीनमध्ये नव्यां व्हायरसची लागण होण्याचं प्रमाण स्थिर आहे. त्यामुळं व्हायरस वेगानं फैलावतोय, असं म्हणणं घाईचं होईल, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय. अमेरिकेच्या चीनमधील दुतावासानं दिलेल्या माहितीनुसार त्यांचा एक नागरिक वुहानमध्ये कोरोनामुळं मृत्यूमुखी पडला आहे. तर जपानच्याही एका 60 वर्षांच्या नागरिकाचा वुहानमध्ये कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: china coronavirus death toll crosses 800 Exceeds SARS deaths