esakal | खूप दिवसांनी चीनमधून आली आनंदाची बातमी; कोरोनाची लस दृष्टीपथात
sakal

बोलून बातमी शोधा

china coronavirus vaccine Chinese scientists Feng-Cai Zhu

चीनमधील हुबेई प्रांतातील वुहान शहरातून कोरोनाचा जगभर फैलाव झाला. सगळ्या जगानं या व्हायरसच्या फैलावासाठी चीनला जबाबदार धरलं. पण, चीननेही या व्हायरसची लस शोधण्यात ताकद पणाला लावल्याचं बोललं जातयं.

खूप दिवसांनी चीनमधून आली आनंदाची बातमी; कोरोनाची लस दृष्टीपथात

sakal_logo
By
रविराज गायकवाड

बीजिंग (China Vaccine):कधी शेजारी राष्ट्रांच्या कुरघोड्या तर, कधी कोरोनाची माहिती लपवण्याचा उद्योग, चीन सातत्यानं नकारात्मक गोष्टींसाठी चर्चेत राहिलेला देश आहे. गेल्या काही महिन्यां तर चीनची जागतिक पातळीवरची प्रतीमा पूर्णपणे ढासळली. अनेक देश चीनशी व्यापारी संबंध तोडत आहेत. पण, आता चीननं एक आनंदाची बातमी दिलीय. चीनमध्ये कोरोनावरील लस तयार करण्याचं संशोधन सुरू आहे आणि या संशोधनातील दुसरा टप्पाही यशस्वीरित्या पार पडला आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठानंतर चीनमधूनही कोरोनाच्या लसी संदर्भात गुड न्यूज ऐकायला मिळाली आहे. 

जगभरातील कोरोनाच्या घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आणखी वाचा - कोरोना लस संशोधनात चिंपांझीची झाली मदत 

कोठे आणि कसे झाले संशोधन?
चीनमधील हुबेई प्रांतातील वुहान शहरातून कोरोनाचा जगभर फैलाव झाला. सगळ्या जगानं या व्हायरसच्या फैलावासाठी चीनला जबाबदार धरलं. पण, चीननेही या व्हायरसची लस शोधण्यात ताकद पणाला लावल्याचं बोललं जातयं. चीनमध्येही मोठ्या प्रमाणावर लस शोधण्याचं काम सुरू होतं. त्या प्रयत्नांना आता यश येत असल्याचं दिसत आहे. हुबेई प्रांतातील वुहान शहरातील एका सेंटरवर कोरोनाच्या संभाव्य लसीची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी झाली असून, ती यशस्वी झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे. या संशोधनात प्रा. फेंग साय झ्हू यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी या लस संशोधनाच्या प्रक्रियेचं नेतृत्व केलं आहे. चीनमधील नानजिंग प्रांतातील जिआंसू प्रोव्हिजनल सेंटर ऑफ डिसिज कंट्रोल आणि प्रोव्हिजन्स, या संस्थेत प्रा. फेंग काम करतात. त्यांच्या मार्गदर्शनाखालील टीमने ही लस शोधण्याच्या प्रक्रियेत काम केला आहे. या लसीचा प्रयोग, पहिल्या टप्प्यात 508 व्हॉलेंटिअर्सवर करण्यात आला. हे सर्वजण 18 आणि 18 वर्षांपुढील होते. ज्यांना ज्यांना ही कोविड प्रतिंबध लस देण्यात आली त्यांची प्रकृती 28 दिवस तपासण्यात आली. त्यानंतर लसीचे परिणाम तपासण्यात आले. 

आणखी वाचा - ऑक्सफर्डमधील कोरोना लसीच्या संशोधनाला यश 

रिचर्ड हॉर्टोन यांचे ट्विट
लॅनसेट या जगातील प्रसिद्ध आरोग्य विषयी साप्ताहिकाचे संपादक रिचर्ड हॉर्टोन यांनी आज लागोपाठ दोन ट्विट केली आहेत. त्यात पहिले ट्विट ऑक्सफर्डमधील कोरोना लस संशोधनाचे असून, त्या पाठोपाठ चीनमधील संशोधनाची माहिती त्यांनी दुसऱ्या ट्विटमधून दिली आहे. त्यात त्यांनी प्रा. फेंग यांचे अभिनंदन केले आहे. चीनच्या लसीमध्येही मानवी शरीराला कोणताही धोका नसून लस दिलेल्यांच्या शरिरात 14 दिवसांत हार्मोनल आणि रोगप्रतिकार शक्ती संदर्भात सकारात्मक बदल दिसल्याचं रिचर्ड यांनी ट्विटमधून स्पष्ट केलंय.