चीनची आता ‘एआय’आधारित न्यायाधीश यंत्रणा

निर्णयक्षमतेमध्ये ९७ अचूकता शक्य. जनता, वकिलांचा मात्र विरोध
china court
china courtSakal

बीजिंग : जगातील सर्वांत वेगवान महासंगणकाची निर्मिती करणाऱ्या चीनने आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) क्षेत्रात आणखी मोठे पाऊल टाकत या तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा न्यायाधीशाची (Judge) निर्मिती केली आहे. दोन्ही बाजूंच्या वकिलांचे तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर तो ९७ टक्के योग्य निर्णय देऊ शकतो, असा दावा करण्यात आला आहे. ‘शांघाय पुडाँग पीपल्स प्रोक्युरेटोरेट’ने या ‘एआय’वर आधारित ‘जज’ची निर्मिती केली आहे. या प्रोग्रॅमच्या वापरामुळे वकिलांवरील कामाचा ताण बऱ्याचप्रमाणात कमी होईल, असे तंत्रज्ञानक्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

‘डेटा’ची पडताळणी करणार

काही प्रकरणामध्ये हा ‘एआय’ने सुसज्ज असणारा न्यायाधीश प्रत्यक्ष निर्णय प्रक्रियेमध्ये वकिलांची देखील जागा घेऊ शकतो. या सगळ्या प्रणालीचा डेस्कटॉप कॉम्प्युटरमध्ये एखाद्या प्रणालीसारखा वापर होऊ शकतो. हा जज संबंधित संगणकीय प्रणालीतील कोट्यवधी डेटाचा अभ्यास करून त्यातील तपशील पडताळून पाहू शकतो. जगातील हजारो खटल्यांचा आधार घेत या न्यायिक प्रणालीची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये साधारपणे २०१५ ते २०२० पर्यंतच्या खटल्यांचा समावेश होता.

china court
म्यॅव म्यॅव ते अध्यक्षपदाची निवडणूक; हिवाळी अधिवेशन गाजलं 'या' सात मुद्यांनी

एखाद्या चुकीला जबाबदार कोण?

सरकारने या प्रोग्रॅमची निर्मिती केली असली तरीसुद्धा लोकांनी त्याला विरोध केला आहे. याबाबत एका वकिलाने सांगितले की,‘‘ या जजमुळे एखाद्या खटल्यामध्ये तांत्रिकदृष्ट्या ९७ टक्के अचूकता येणार असली तरीसुद्धा त्यातही चूक राहू शकते. अशा स्थितीमध्ये ही चूक राहिली तर त्याची जबाबदारी कोण घेईल? यामध्ये वकील किंवा अल्गोरिदमच्या डिझायनरला जबाबदार धरायचे का? एआयच्या माध्यमातून चुका शोधता येऊ शकतात पण तो माणसाची जागा कधीच घेऊ शकत नाही.’’

ब्रिटन, अमेरिकेची धास्ती

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रामध्ये चीन आणि रशियाने घेतलेल्या भरारीमुळे ब्रिटन आणि अमेरिकेचे धाबे दणाणले असून ब्रिटनची गुप्तचर संस्था ‘एमआय-६’ ने दिलेल्या इशाऱ्यामध्ये म्हटले आहे की, ‘‘ आमच्या शत्रूचा कृत्रिम बुद्धिमत्तेवर प्रभुत्व निर्माण करण्याचा इरादा असून क्वांटम कॉम्प्युटिंग, सिथेंटिक बॉयोलॉजी या विषयातील संशोधनात चीन प्रचंड पैसा खर्च करतो आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हे सगळे बदल घडवून आणता येतील याचा त्यांना पूर्ण विश्वास आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com