चीनमध्ये मशिदींचे घुमट केले जातायत नष्ट; अल्पसंख्यांकविरोधी मोहीम सुरु

china mosque
china mosque
Updated on

बिजींग : चीनमध्ये उइगर मुस्लिमांसोबत होणारा अन्याय आता चव्हाट्यावर आला आहे. इस्लामी प्रभावाच्या विरोधात चीनने आतापर्यंत अनेक मशिदींना आणि इस्लामी इमारतींना नष्ट केलं आहे. हजारोंच्या संख्येने उइगर मुस्लिम आजही डिटेंशन सेंटरमध्ये कैद आहेत. काही दिवसांपूर्वी चीनने शिनजियांग प्रांतातील आतुशमध्ये एका मशिदीला पाडून तिथे शौचालय बनवलं होतं. आणि आता पुन्हा असाच एक मामला समोर आला आहे. चीनमध्ये अरबी शैलीनुसार बनवलेल्या एका मशिदीचे घुमट नष्ट करण्यात आले आहेत. चीनच्या अधिकाऱ्यांनी देशभर असे घुमट उद्ध्वस्त करण्याची मोहीमच चालवली असल्याची माहिती समोर आली आहे. 

मशिदीचा घुमट पाडला
द टेलीग्राफ या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, निंगजिया प्रांताची राजधानी यिनचुआनमध्ये मुख्य मशिदीच्या आकारामध्ये आता काही बदल आढळले आहेत. या ठिकाणी मोठ्या संख्येने चीनमधील  हुई जातीचे मुस्लिम अल्पसंख्यांक राहतात. याठिकाणी असणाऱ्या सोनेरी रंगाच्या नंगान मस्जिदीच्या वरील बाजूस असणाऱ्या कांद्याच्या आकाराचा घुमट आता पाडण्यात आला आहे. त्याआधी मशिदीतील सोनेरी इस्लामिक शैलीच नक्षी, सजावट आणि अरबी लिपीत लिहिलेले शब्दही नष्ट करण्यात आले आहेत.

अल्पसंख्यांवर अत्याचार
या मशिदींचे जे काही अवशेष उरले आहेत ते काही ओळखण्याजोगे नाहीयेत. म्हणजे त्या मशिदी होत्या हे देखील आपल्याला समजणार नाही, अशी त्यांची आता अवस्था आहे. चीनमध्ये ब्रिटनच्या मिशनचे उपप्रमुख क्रिस्टीना स्कॉट यांच्याद्वारे ऑनलाईन पोस्ट केलेल्या एका चित्रामध्ये दाखवलंय की चीनमधील मशिदींच्या विरोधात चालवल्या गेलेल्या या मोहीमेची एक झलक पाहिली जाऊ शकते. स्कॉट यांनी ट्विटरवर लिहलंय की, ट्रिप एडव्हायझरने यिनचुआनमध्ये नुआंगन मशीद फिरण्याचा मला सल्ला दिला. सोबत फोटो पोस्ट करत स्कॉट यांनी लिहलंय की, तिथे जे काही दिसत आहे ते हेच आहे. घुमट, मिनार सगळं काही नष्ट केलं गेलं आहे. कुणाही नवीन आगंतुक माणसाला इथे यायची परवानगी नाहीये. हे खूप निराशजनक आहे. 

सतत सुरु आहे ही मोहीम
ब्रिटेनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयाने सांगितलं की, आम्ही चीनमध्ये इस्लाम आणि इतर धर्मीयांवर लावल्या गेलेल्या निर्बंधामुळे चिंतित आहोत. आम्ही चीनला आवाहन करतो की त्यांनी धार्मिक स्वातंत्र्य आणि विश्वासाला त्यांच्या संविधानानुसार आणि आंतराराष्ट्रीय दायित्वानुसार चालू ठेवावं. मात्र, वास्तवात चीनमध्ये इस्लामी शैलीने बनलेल्या मशीदींच्या घुमटांना सातत्याने नष्ट केलं जात आहे. लिटल मक्का या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या लिनेक्सियामध्ये देखील इस्लामी इमारतींना नष्ट केलं जात आहे. 

चीनची ही कुरापत काही नवी नाहीये. शिंजियांगमध्ये मोठ्या संख्यने मुस्लिमांना डिंटेशन सेंटरमध्ये ठेवलं गेलं आहे. इथे त्यांना मोठ्या प्रमाणावर शारिरीक छळाला सामोरो जावे लागते. दाढी वाढवणे, उपवास करणे आणि कुरान वाचणे या साऱ्या कृतींना संशयास्पद मानलं जातं. अशा लोकांना डिटेंशन सेंटरमध्ये नजरकैद करुन ठेवलं आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com