चिनी अ‍ॅपवरील बंदीनंतर चीनने दिली पहिली प्रतिक्रिया

Gao Feng
Gao Feng

चीन - मागील 4-5 महिन्यांपासून चीन आणि भारतातील संबंध मोठ्या प्रमाणात ताणले आहेत. या वादाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी चीनच्या 118 अ‍ॅपवर भारताने बंदी घातली आहे, यामध्ये पबजी या प्रसिध्द गेमिंग अ‍ॅपचाही सामावेश आहे. यानंतर सोशल मिडियावर याची मोठी चर्चा चालू आहे. याअगोदरही भारताने चीनच्या 59 अ‍ॅपवर बंदी घातली होती. मंगळवारी केलेल्या भारताच्या या कृतीला आता चीनने प्रत्युत्तर दिले आहे.  चीनने भारताच्या कारवाईचा विरोध केला असून 'भारताने चीनच्या मोबाइल अ‍ॅप्सवर घातलेली बंदी चुकीची असून यामुळे चिनी गुंतवणूकदार आणि सेवा पुरवठादारांच्या कायदेशीर हितांचं उल्लंघन झालं आहे', अशी प्रतिक्रिया चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने दिली आहे. 

 'Reuters' या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, चीन भारताच्या या कारवाईवर गंभीर असून भारताने आपली चूक सुधारावी' असं वाणिज्य मंत्रालयाचे प्रवक्ते जी. फेंग (Gao Feng) म्हणाल्याची माहिती दिली आहे. चीनसोबतच्या वादानंतर  Apps वर बंदी घालण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी जून महिन्यात गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर भारताने टिकटॉकसह 47 अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. त्यानंतर जुलैच्या शेवटी 59 अ‍ॅप्सवर बंदी घातली. सरकारने या कारवाईमागे राष्ट्रीय सुरक्षा असल्याचं कारण दिलं होतं. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, PUBG शिवाय  Baidu,APUS लाँचचर प्रो यावरही बंदी घातली आहे. जून महिन्यात भारताने चीनच्या 47 अ‍ॅप्सना दणका दिला होता. त्यामध्ये ShareIt, UC Browser, Shein, Club Factory, Clash of Kings, Helo, Mi Community, CamScanner, ES File Explorer, VMate या अ‍ॅप्सचा समावेश होता. त्यानंतर आणखी एकदा सरकारने चिनी अ‍ॅपवर बंदी घालून दणका दिला होता. सरकारने चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालताना म्हटलं होतं की, संबंधित अ‍ॅप्सकडून डेटा चोरी, संशयास्पद माहितीची देवाण घेवाण तसंच देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असल्यानं कारवाई करण्यात आली होती.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com