चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांच्याकडून जयशंकर यांचे अभिनंदन

चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांच्याकडून जयशंकर यांचे अभिनंदन

बीजिंग : भारताच्या परराष्ट्रमंत्रिपदी नियुक्ती झाल्याबद्दल एस. जयशंकर यांचे चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अभिनंदन केले असून, दोन्ही देशांमधील संबंध अधिक बळकट करण्यासाठी जयशंकर यांच्याबरोबर काम करण्यात आपण उत्सुक आहोत, असे म्हटले आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी रात्री प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नमूद केले आहे, की चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी त्यांचे भारतातील समकक्ष जयशंकर यांचे अभिनंदन केले आहे. भारत- चीन द्वीपक्षीय संबंध सुधारण्याबाबत जयशंकर यांच्या दृष्टिकोन सकारात्मक असून, त्यांच्या बरोबर काम करण्यात आपण उत्सुक आहोत. वांग यी यांनी जयशंकर यांना शुभेच्छा संदेशही पाठविला असल्याचे सांगण्यात आले. भारताच्या परराष्ट्र सचिव पदावरून 16 महिन्यांपूर्वी निवृत्त झालेल्या जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी नव्या सरकारमध्ये सोपविण्यात आली आहे.

जयशंकर यांनी 2006 ते 2013 या कालावधीमध्ये भारताचे चीनमधील राजदूत म्हणून काम पाहिले आहे. तर 2015 ते 2018 या काळात त्यांच्याकडे परराष्ट्र सचिव पदाची जबाबदी होती. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com