
नवी दिल्ली- जगात कोणता देश सर्वात शक्तीशाली आहे, याबाबत सर्वांनाच उत्सुकता असते. यासंबंधी एक रिपोर्ट जारी करण्यात आला आहे. चीनच्या आक्रमकपणामुळे भारतासह अनेक देश त्रस्त आहेत. चीन असा देश आहे, ज्याच्या हाती ताकद आहे, पण त्याचा वापर तो नेहमी दुसऱ्या देशांवर दादागिरी करण्यासाठी करत असतो. अमेरिका देश आज सुपर पॉवर म्हणून ओळखला जातो. पण, लष्करासंबंधी आलेल्या एका रिपोर्टमुळे सर्वांच्या चिंतेत भर पडली आहे. डिफेन्स वेबसाईट मिलिट्री डायरेक्टद्वारे रविवारी जारी करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, चीनजवळ जगातील सर्वाधिक शक्तीसाली सैन्य आहे. चीनकडे सैनिकांची मोठी संख्या असून याच्या माध्यमातून तो कोणत्याही देशाला आव्हान देऊ शकतो, असं अभ्यासात म्हणण्यात आलं आहे. अभ्यासात भारताला चौथ्या क्रमांकाचा सर्वात शक्तीशाली देश ठरवण्यात आलं आहे. अभ्यासात म्हणण्यात आलंय की, संयुक्त राज्य अमेरिकेचे सैन्य बजेट मोठे असले तरी, तो 74 अंकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर 69 अंकासह रशिया तिसऱ्या स्थानावर आहे. भारत या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर असून देशाला 61 अंक मिळाले आहेत. 58 अंकांसह फ्रान्स पाचव्या स्थानावर आहे. दुसरीकडे 43 अंकासह इंग्लंड नवव्या स्थानावर आहे.
अभ्यासात म्हणण्यात आलंय की, 'अंतिम सैन्य शक्ती सूचक अंक' बजेट, निष्क्रिय आणि सक्रिय सैनिकांची संख्या, एकूण हवा, समुद्र, भूमि आणि परमाणु संसाधन, सरासरी वेतन आणि विविध प्रकारचे अत्याधुनिक उपकरणे यांना लक्ष्यात घेऊन अंक ठरवले जातात. यात 100 पैकी 82 अंक मिळवून चीन जगातील सर्वात शक्तीशाली देश ठरला आहे. बजेट, सैनिकांची संख्या, सामरिक शक्ती अशा क्षमतांच्या आधारावर इंडेक्स तयार केला जातो. या इंडेक्सवरुन स्पष्ट होतंय की, चीनने गेल्या काही वर्षांपासून प्रचंड गतीने आपली शक्ती वाढवली आहे.
732 अब्ज अमेरिकी डॉलर प्रतिवर्ष बजेटसह अमेरिका लष्करावर सर्वाधिक खर्च करणारा देश आहे. दुसरीकडे चीन 261 अब्ज बिलियन डॉलरसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारत 71 अब्ज डॉलर दरवर्षी आपल्या सैन्यावर खर्च करत असतो. अभ्यासात सांगण्यात आलंय की, चीन समुद्र, अमेरिका हवा आणि रशिया जमिनीवर शक्तीशाली आहे.
चीनचा आक्रमकपणा वरचेवर वाढत चालला आहे. चीनने आपल्या सैन्यांच्या संख्येत प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. दक्षिण चिनी समुद्रात चीनचे निर्विवाद वर्चस्व आहे. चीनचे अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांशी संबंध चांगले नाहीत. हाँगकाँगमध्ये चीन करत असलेल्या दादागिरीमुळे इंग्लडसोबतही त्याचे बिनसले आहे. असे असले तरी चीनने आपला हेकेखोरपणा कायम ठेवला आहे. आपल्या आक्रमक धोरणाने इतरांना दबावात आणणे हेच चीनचे धोरण राहिले आहे. गेल्या काही दिवसात भारत आणि चीनमधील संबंध टोकाला गेले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.