चीनने कोरोनजन्य परिस्थितीतही संरक्षण बजेट भारताच्या तिपटीने वाढवले

China, defense budget, India
China, defense budget, India

बिजिंग : कोरोनाजन्य परिस्थितीमुळे जगभरातील राष्ट्रांची अर्थव्यवस्था पटरीवर आणण्यासाठी खटाटोप सुरु असताना चीन संरक्षणावरील खर्चात वाढ करत आहे. जगभरातील जवळपास 50 हजार लोकांना चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना विषाणूची लागण झाली आहे. कोरोना विषाणूचे वेगाने होणारे संक्रमण रोखण्यासाठी अनेक देशात लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला. यामुळे जागतिक अर्थकारणावर मोठा परिणाम झाला आहे. कोरोनाच्या संकटातून सावरत असताना जगभरातील अनेक राष्ट्रांसमोर अर्थिक संकटही निर्माण झाले आहे. कोरोनाच्या युद्धजन्य परिस्थितीत चीन संरक्षणावरच भर देताना दिसते.   

चीनच्या मागील अर्थसंकल्पात 177.6 अब्ज डॉलरची तरतूद ही संरक्षण क्षेत्रासाठी करण्यात आली होती. कोरोनाजन्य परिस्थिती असताना चीनने यात वाढ केली आहे. यंदाच्या वर्षी चीनने संरक्षणासाठी तब्बल 179 अब्ज डॉलर इतका खर्च करणार असल्याचा प्रस्ताव मांडला आहे. भारताच्या संरक्षण खर्चाच्या तुलनेत हा आकडा तिप्पट आहे. संरक्षणावर सर्वाधिक खर्च करणारा चीन जगातील दुसरा देश असून  या यादीत अमेरिका अव्वलस्थानावर आहे. 

चीनच्या नव्या मसुद्यानुसार, 2020 मध्ये संरक्षण खर्चाच्या बजेटमध्ये  6.6 टक्के वाढ करण्यात येणार आहे. मागील पाच वर्षांपासून चीनच्या संरक्षण बजेटमधील वृद्धी ही 10 टक्के पेक्षा कमी आहे. जगातील सर्वाधिक सैन्य असणाऱ्या देशातही चीनचा दुसरा क्रमांक लागते. त्यांच्याकडे 20 लाख सैन्य आहे.  चीनमध्ये नॅशनल पीपल्स काँग्रेसचे प्रवक्ता झांग युसुई यांनी प्रसारमाध्यमांला दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या संरक्षण बजेटमध्ये पारदर्शकतेचा कोणताही अभाव नाही. एवढेच नाही तर बजेटव्यतिरिक्त सैन्यावर कोणत्याही प्रकारे छुपा खर्च केला जाणार नाही, असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.  

चीन 2007 पासून संयुक्त राष्ट्राला सैन्य दलावरील खर्चाता हिशोब देत आहे. पैसे कुठून येतात? ते कशा पद्धतीने खर्च केले जातात? याचा सर्व लेखाजोखा आमच्याकडे आहे. संरक्षण बजेट हे जीडीपीच्या 'सकल राष्ट्रीय उत्पादन' (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट) 1.3 टक्के आहे, असेही झांग युसुई यांनी सांगितले आहे. चीनच्या या भूमिकेमुळे भारतासह अन्य राष्ट्रांना देशाच्या संरक्षण खर्च वाढवण्याची नामुष्की ओढावली आहे. 2020 मध्ये भारताने संरक्षणासाठी  66.9 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी तरतूद केली होती. चीनचे नवे बजेट भारताच्या 2.7 पटीने अधिक आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com