आशिया, युरोप, आफ्रिकेत "ड्रॅगन'चा पदरव...

वृत्तसंस्था
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

"सिल्क रोड' फंडसाठी चीनने तब्बल 40 अब्ज डॉलर्सची तरतूद केली आहे. चीनने स्थापन केलेल्या आशिया पायाभूत सुविधा गुंतवणूक बॅंकेच्या पार्श्‍वभूमीवरही वन बेल्ट वन रोड योजना अत्यंत संवेदनशील मानण्यात येत आहे

बीजिंग - ऐतिहासिक "रेशीम मार्गा'चे पुनरुज्जीवन करण्याच्या चीनच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या पार्श्‍वभूमीवर येत्या मे महिन्यामध्ये होणाऱ्या महत्त्वपूर्ण परिषदेमध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण चीनकडून ब्रिटीश पंतप्रधान थेरेसा मे यांना देण्यात आले आहे. मे या या वर्षात चीनला भेट देणार आहेत. या परिषदेची सविस्तर माहिती चीनकडून अद्याप उघड करण्यात आलेली नाही.

"वन बेल्ट वन रोड' हा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा अत्यंत संवेदनशील धोरणात्मक कार्यक्रम मानला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत आशिया, आफ्रिका व युरोप या खंडांमध्ये चीनकडून मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा प्रकल्पांची बांधणी करण्यात येणार आहे. "सिल्क रोड' फंडसाठी चीनने तब्बल 40 अब्ज डॉलर्सची तरतूद केली आहे. चीनने स्थापन केलेल्या आशिया पायाभूत सुविधा गुंतवणूक बॅंकेच्या पार्श्‍वभूमीवरही वन बेल्ट वन रोड योजना अत्यंत संवेदनशील मानण्यात येत आहे.

या परिषदेसाठी आशिया, युरोप, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेमधील सुमारे 20 देशांचे प्रतिनिधी हजर राहणार असल्याचे चीनकडून सांगण्यात आले असले; तरी या देशांचे नावे अद्यापी जाहीर करण्यात आलेली नाहीत.

Web Title: China invites Britain to attend new Silk Road summit