महिलांच्या सुरक्षिततेसाठी चीन विशेष कायदा आणण्याच्या तयारीत

महिलाच्या हक्कांचं आणि अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी विशेष तरतुदी
china
chinaesakal

घरघुती हिंसाचार, लैंगिक छळ (Crime Against Women) आणि मी-टु कँपेनमधून (Me Too) समोर आलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी चीनने कठोर पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. महिलांचे अधिकार आणि हक्कांचं संरक्षण करण्यासाठी तसेच महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठीच्या कायद्याचा मसुदा सोमवारी चीनच्या पीपल्स काँग्रेसच्या (NPC) स्थायी समितीकडे सोपवण्यात आला आहे.

china
अमेरिकेला साथ देऊन पायावर धोंडा मारून घेतला ; इम्रान खान

'शिन्हुआ' या अधिकृत वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, सुमारे 30 वर्षांपूर्वी लागू झालेल्या या कायद्यात मोठी सुधारणा करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. NPC लवकरच विधेयकाचा मसुदा पास करेल अशी शक्यता आहे. महिला अत्याचाराला (Women Exploitation) कारणभूत असणाऱ्या अंधश्रद्धेसारख्या प्रथांना प्रतिबंधित करण्यासाठी आणि विद्यमान महिला कायद्यातील प्रस्तावित बदलांनुसार महिला अर्जदारांना त्यांच्या वैवाहिक किंवा गर्भधारणा स्थितीबद्दल विचारण्यास मालकांना प्रतिबंधित करण्याची तरतुद या विधेयकात आहे.

china
Vodafone SMS : जगातील पहिल्या 'SMS'चा लिलाव

मसुदा विधेयकात कौटुंबिक जीवनात पती आणि पत्नी दोघांची संयुक्त कर्तव्यं देखील स्पष्ट करण्यात आली असल्याची माहिती शिन्हुआच्या वृत्तामधून समोर आली आहे. घटस्फोटाच्या वेळी पतीकडून आर्थिक सहाय्य मागण्याचा अधिकार स्त्रियांना असेल, जर पत्नी मुलाचे संगोपन, वृद्धांची काळजी घेणे आणि पतीला कामात मदत करण्यासाठी अधिक कर्तव्ये पार पाडत असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com