China Landslide: चीनमध्ये मोठी दुर्घटना! भूस्खलनात ४७ लोक ढिगाऱ्याखाली अडकले; युद्धपातळीवर बचावकार्य सुरु

China Landslide: चीनमधील युनान या डोंगराळ भागात एक मोठी दुर्घटना घडली आहे. भूस्खलनात ४७ लोक ढिगाऱ्याखाली दबल्याचे वृत्त समोर आले आहे.
China Landslide
China Landslide Esakal

चीनमधील युनान या डोंगराळ भागात एक मोठी दुर्घटना घडली आहे. भूस्खलनात ४७ लोक ढिगाऱ्याखाली दबल्याचे वृत्त समोर आले आहे. घटनास्थळावरून 200 जणांची सुटका करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मदत आणि बचाव कार्य अद्यापही सुरू आहे. भूस्खलनात अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना चीनच्या दक्षिण-पश्चिम प्रांत युनानमध्ये घडली. युनानमधील लियांगसुई गावात आज (सोमवारी) सकाळी सहा वाजता भूस्खलन झाले आहे.

China Landslide
Afghanistan Plane Crash : अफगाणिस्तानमध्ये क्रॅश झालेलं विमान भारतीय नाही; DGCA ने दिली दिलासादायक माहिती!

मदत आणि बचाव कार्य सुरूच

अपघाताचा परिसर झेनजियांग काउंटीमधील तांगफांग शहराचा आहे. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू असल्याचे प्रशासनाने निवेदन जारी केले आहे. भूस्खलनात 18 घरे ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याचे वृत्त आहे.

या भागातून मोठ्या प्रमाणात लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. भूस्खलनाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. चीनच्या युनान प्रांतात भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. हा चीनचा एक दुर्गम भाग आहे, जिथे मोठे पर्वत आहेत.

China Landslide
Maldives President: मालदीवच्या हट्टीपणामुळे 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू? उपचारांसाठी करायचं होतं एअरलिफ्ट, राष्ट्रपतींनी नाकारली भारतीय विमानाला परवानगी

या भीषण दुर्घटनेत बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यासाठी 33 अग्निशमन वाहने आणि 10 लोडिंग मशीनसह 200 हून अधिक बचाव पथकातील कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत. दुर्घटनास्थळी अद्यापही काही लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून मदत आणि बचाव कार्य अजून सुरू आहे. भूस्खलनात अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com