स्पेस स्टेशनवर चीनने पाठवली पहिली चालक टीम

china space
china space
Summary

चीनने आपल्या तियांगोंग स्पेस स्टेशनसाठी चालक म्हणून तीन अंतराळवीरांना स्पेस शिपमधून अवकाशात पाठवलं आहे. गेल्या पाच वर्षातील चीनचे हे पहिले मानवयुक्त अवकाश उड्डाण आहे.

बिजिंग- चीनने आपल्या तियांगोंग स्पेस स्टेशनसाठी चालक म्हणून तीन अंतराळवीरांना स्पेस शिपमधून अवकाशात पाठवलं आहे. गेल्या पाच वर्षातील चीनचे हे पहिले मानवयुक्त अवकाश उड्डाण आहे. नव्या अपडेटनुसार स्पेस शिप शेनझोऊ-12 चीनच्या गोबी वाळवंटातून सकाळी तीन वाजता अंतराळवीरांसोबत लाँच करण्यात आले. चीनची ही मोठी अंतराळ मोहीम मानलं जात आहे. (China launches manned space mission first crew to the station three astronauts)

माहितीनुसार, चीनच्या या हाय-टेक मिशनचे नेतृत्व 56 वर्षीय नी हॅशेंग करत आहेत आणि त्यांच्यासोबत लियु बोमिंग आणि टेंग होंग्बो हेही मिशनमध्ये सहभागी आहेत. चायना स्पेस एजेन्सीचे अधिकारी जी किमिंग यांनी बुधवारी सांगितलं की, अवकाश यान 'शेनझोऊ-12' चा जियुक्वान उपग्रह प्रक्षेपण केंद्रापासून प्रक्षेपित करण्यात आला. हे यान तीन अंतराळवीरांना चीनच्या स्पेस स्टेशनच्या निर्माणासाठी अवकाशात घेऊन गेला आहे. स्पेस स्टेशनच्या निर्माणादरम्यान अंतराळवीरांना घेऊन जाणारे ही पहिली चीनची मोहीम आहे.

china space
कोविशिल्डचा पहिला डोस डेल्टा व्हेरिएन्टवर किती प्रभावी?

सरकारी वृत्तसंस्था सिन्हुआने सांगितलं की, ऑर्बिटमध्ये प्रवेश केल्यानंतर स्पेस शिप स्पेस स्टेशनच्या कोर मॉड्यूल त्यानहेशी जोडले जाईल. शेनझोऊ-12 मधील अंतराळवीर कोर मॉड्यूलमध्ये असतील आणि तीन महिन्यापर्यंत ते ऑर्बिटमध्येच राहतील. लॉन्ग मार्च-2 एफ रॉकेटच्या माध्यमातून हे यान प्रक्षेपित करण्यात आले आहे. स्पेस स्टेशनचे काम सध्या सुरु आहे पण यावर्षीच्या शेवटापर्यंत स्टेशन पूर्णपणे तयार होईल, असं सांगितलं जात आहे.

china space
'भाजपच्या सो कॉल्ड नेत्यांनी फक्त वेळ आणि तारीख सांगावी'

चायना स्पेस इंजिनियरिंग ऑफिसचे अधिकारी यांग लिवेई म्हणाले की, अंतराळवीर तीन महिन्यापर्यंत अंतराळात राहतील. याकाळात ते देखरेख आणि दुरुस्तीचे काम करतील. अंतराळ केंद्र तयार होण्याआधी यावर्षी आणि पुढील वर्षी अवकाशात 11 मिशन पाठवण्याची चीनची योजना आहे. त्यामुळे चीन अवकाश क्षेत्रात मोठी प्रगती करताना दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com