esakal | तणाव वाढणार? अफगाणिस्तानात चीनच्या लष्करी विमानांचे लँडिंग
sakal

बोलून बातमी शोधा

बगराम एअरबेस

तणाव वाढणार? अफगाणिस्तानात चीनच्या लष्करी विमानांचे लँडिंग

sakal_logo
By
दीनानाथ परब

काबूल: अमेरिकन सैन्याने (american army) अफगाणिस्तानातून (Afganistan) माघार घेतल्यानंतर पहिल्यांदाच बगराम एअरबेसवर (bagram airbase) लष्करी विमाने लँडिंग करताना दिसली आहेत. ही विमाने चिनी सैन्याची (china army) असण्याची शक्यता आहे. आता बगराम एअरबेसवरील दिवे सुद्धा सुरु करण्यात आले आहेत. बगराम तोच एअर बेस आहे, ज्यावर चीनची सुरुवातीपासून नजर आहे. अमेरिकन सैन्याने बगराम एअर बेस सोडल्यानंतर चीन हा हवाई तळ आपल्या ताब्यात घेईल अशी शक्यता वर्तवली जात होती.

बगराम एअरबेस अमेरिकन सैन्याचा मजबूत किल्ला होता. इथूनच त्यांनी अनेक ऑपरेशन्स केली आहेत. अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानातून मायदेशी परतल्यानंतर इथे पहिल्यांदा लष्करी विमानांची हालचाल दिसून आली आहे. डेली मेलने हे वृत्त दिले आहे.

हेही वाचा: आर्यनला धीर देण्यासासाठी 'आई' येणार कोर्टात

चीनला बगराम एअरबेस आपल्या ताब्यात घ्यायचा आहे. बगराम एअर बेसवरुन अनेक विमानांनी टेक ऑफ आणि लँडिंग केलं आहे. तालिबानला अशी विमाने वापरण्याचा अजिबात अनुभव नाहीय. त्यामुळे ही विमाने चीनची असल्याचा दावा करण्यात येत आहे. बगराम एअरबेस अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या जवळ आहे. अफगाणिस्तानात सत्तेवर असलेल्या तालिबान राजवटीला चीनकडूनच आर्थिक मदत मिळू शकते.

हेही वाचा: NCB चे कॉर्डेलिया क्रूझवर पुन्हा सर्च ऑपरेशन; आणखी 8 जण ताब्यात

पाकिस्तान आणि चीन या दोन देशांनी तालिबानला पाठिंबा दिला आहे. अफगाणिस्तानातल्या नैसर्गिक साधन संपत्तीवर चीनची नजर आहे. त्यामुळे चीन पुढच्या काही दिवसात अफगाणिस्तानात मोठी गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहारांमुळे रणनीतीक दृष्टीने महत्त्वाचा असलेले बगराम एअरबेस चीनकडे जाण्याची शक्यता आहे.

loading image
go to top