भारतानंतर चीनने रशियाची घेतला पंगा; अख्या शहरावर सांगितला दावा

कार्तिक पुजारी
Friday, 10 July 2020

भारतासोबत पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात वाद घातल्यानंतर चीनने आता आपला मोर्चा रशियाकडे वळवला आहे. चीनने रशियाच्या ताब्यातील व्लाडिवोस्टोक (vladivostok) शहर चीनचा भाग असल्याचं म्हटलं आहे

मॉस्को- भारतासोबत पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात वाद घातल्यानंतर चीनने आता आपला मोर्चा रशियाकडे वळवला आहे. चीनने रशियाच्या ताब्यातील व्लाडिवोस्टोक (vladivostok) शहर चीनचा भाग असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे रशिया आणि चीनमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

नेपाळची हिंमत वाढतेय; भारताविरोधात उचललं आणखी एक पाऊल
व्लाडिवोस्टोक शहराच्या 160 व्या स्थापना दिनानिमित्त रशियाकडून एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. चीनच्या एका अधिकाऱ्यांने यावर प्रतिक्रिया देत व्लाडिवोस्टोक एकेकाळी चीनचा भाग असल्याचं म्हटलं आहे. चीनमधील पत्रकार आणि अनेक अधिकाऱ्यांनीही हा भाग आमचा असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे चीनची विस्तारवादाची मनिषा पुन्हा समोर आली आहे. 

एकोनीसाव्या शतकात  व्लाडिवोस्टोक शहर आमच्या ताब्यात होते. त्यावेळी हे शहर किंग वंशातील 'हॅश्ववाई' नावाची मंजुरीअन जन्मभूमी होती. मात्र, 1860 मध्ये चीनच्या दुसऱ्या अफू युद्धात रशियाने हा भाग आपल्या ताब्यात घेतला होता, असा दावा चिनी अधिकाऱ्याने केला आहे. 

चिनी अ‍ॅपची अमेरिकेत क्रेझ कमीच
चीनचे सध्या 21 देशांसोबत सीमावाद सुरु आहेत. चीन आणि जपानमध्ये अनेक बेटांवरुन वाद आहेत. शिवाय चीनने जपानचे अनेक बेटे बळकावले आहेत. नुकताच चीनचा भारतासोबत सीमावाद निर्माण झाला होता. चीनने गलवान खोऱ्यावर आपला दावा सांगतला होता. यातून भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष होऊन भारताचे 20 जवान शहीद झाले होते. चीन सध्या गलवान खोऱ्यातून माघार घेत असला तरी पुन्हा अशी घुसखोरी होणार नाही याची शाश्वती देता येत नाही. चीनने भूतानसोबतही वाद उकरुन काढला आहे. भूतानच्या एका भूप्रदेशावर चीनने दावा केला आहे. त्यामुळे चीन एकाचवेळी अनेक देशांशी वाद घालत असल्याचं दिसत आहे.

दरम्यान, ब्रिटिश आणि चीनमध्ये दुसरे अफू युद्ध झाले होते. यावेळी ब्रिटिशांचा विजय होऊन त्यांनी 'हॅश्ववाई' हा भाग मिळवला होता. त्यानंतर हा भाग रशियाकडून ताब्यात घेण्यात आला. चीनने या भागाला नेहमीच आपला भूभाग म्हणून सांगितलं आहे. शिवाय चीन या भूभाचा उल्लेख मंजुरीअन म्हणून करतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: China Now Picks Up Territorial Dispute With Russia