esakal | जगातील सर्वाधिक उंच रडार लोकेशनवर 5G सिग्नल स्टेशन; सीमा भागात चीनची नवी खेळी

बोलून बातमी शोधा

china.

जगावर प्रभुत्व निर्माण करु पाहणारा चीन आपली महत्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकतं. आपल्या याच ध्येयाला समोर ठेवून चीनने एक नवा डाव खेळला आहे.

जगातील सर्वाधिक उंच रडार लोकेशनवर 5G सिग्नल स्टेशन; सीमा भागात चीनची नवी खेळी

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

बीजिंग- जगावर प्रभुत्व निर्माण करु पाहणारा चीन आपली महत्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकतं. आपल्या याच ध्येयाला समोर ठेवून चीनने एक नवा डाव खेळला आहे. चीनने तिबेटमधील हिमालय भागात जगातील सर्वाधिक उंच असणाऱ्या गनबाला रडार स्टेशनवर ५जी सिग्नल बेस सुरु केला आहे. मानवाच्या उपस्थितीत या रडार स्टेशनचे काम संचलित केले जाणार आहे. चिनी सैन्याच्या अधिकृत वेबसाईटने सोमवारी यासंदर्भातील माहिती दिली आहे. हे रडार स्टेशन ५,३७४ मीटर उंचावर आहे. हा पर्वत तिबेटच्या नागरजे काऊंटीमध्ये आहे. हे स्टेशन भारत आणि भूतानच्या सीमेपासून जवळच आहे. वेबसाईटवर सांगण्यात आलंय की, मागील वर्षी पीपल्स लिबरेशन आर्मीला सीमावर्ती भागात मोबाईल नेटवर्क मिळत नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यामुळेच गनबाला येथे काही कंपन्यांच्या मदतीने ५ जी स्टेशनचे निर्माण करण्यात आले आहे.  

देशात कोरोना रुग्णांची संख्या का वाढतेय? तज्ज्ञांनी सांगितली 4 कारणं

गेल्या जवळपास १ वर्षांपासून भारत आणि चीनमध्ये तणावाची स्थिती आहे. दोन्ही देशाचे सैन्य सीमा भागात आमनेसामने उभे ठाकले आहे. लडाखच्या अनेक भागातून दोन्ही सैन्यांनी माघार घेतली आहे. पण, अजूनही काही महत्त्वाच्या ठिकाणी स्थिती जैसे-थै आहे. दोन्ही देशांमध्ये कमांडोस्तरावर चर्चा सुरु आहे. पण, अजूनही यातून निर्णायक तोडगा निघू शकलेला नाही. सीमा भागात चीनने अनेक निर्माण कार्य घाती घेतले आहेत. विशेष म्हणजे चीनची निर्माण गती अत्यंत वेगवान आहे.