पाकिस्तान-चीनमध्ये गुप्त करार!; जैविक युद्धासाठी दोन्ही देशांची तयारी?

imran khan adn xi zingping.png
imran khan adn xi zingping.png

बिजिंग- संपूर्ण जग कोरोना महामारीविरोधात लढत असताना एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. चीन पाकिस्तानसोबत मिळून जैविक युद्धाची तयारी करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. यासाठी चीनने पाकिस्तानला केंद्र बनवले आहे. दोन्ही देशांमध्ये याबाबत एक गुप्त करार झाला आहे. याअंतर्गत उभय देश खतरनाक बॅक्टेरिया, विषाणू आणि अन्य जीवाणू यांच्यावर संशोधन करत आहेत. 

अमेरिकेच्या कारवाईने घायाळ झालेल्या चीनने केला पलटवार
klaxon च्या सूत्रांनुसार,  पाकिस्तान आणि चीनमध्ये जैविक शस्त्रास्त्रांची क्षमता आणि विकास करण्यासाठी तीन वर्षांचा गुप्त करार झाला आहे. पाकिस्तानचे लष्कर चीनला या कामात मदत करत आहे. चीन आपल्या देशाबाहेर हा प्रकल्प राबवू इच्छित होता, जेणेकरुन आंतरराष्ट्रीय टीकेला त्याला सामोरे जावे लागू नये. वुहान प्रयोगशाळेला पाकिस्तानला आर्थिक आणि वैज्ञानिक मदत दिली जात आहे. या प्रकल्पाला संपूर्ण निधी चीन देत आहे.

भारताला आहे धोका

तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, भारताला धडा शिकवता यावे यासाठी पाकिस्तान या प्रकल्पात गुंतला आहे. चीनने पाकिस्तानला जैविक संशोधनाचे केंद्र बनवले आहे, कारण कोणत्याही टीकेला त्याला सामोरे जावे लागू नये.

पाकिस्तानच्या जैविक केंद्रात अनेक बॅक्टेरिया आणि विषाणूंवर काम केले जात आहे. klaxon च्या सूत्रांनुसार, चीन आणि पाकिस्तानने bacillus Thuringienesis ला वेगळे करण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. हा प्रयोग Bacillus Anthracis म्हणजे Anthrax याच्याशी मिळताजूळता आहे. यामुळे दोन्ही दैशांनी जैविक संशोधनात मोठी मजल मारल्याचं सांगितलं जात आहे.

वुहान प्रयोगशाळेने पाकिस्तानला BT साठी केमीकल रीएजेंट्स दिले आहेत. पैथोजन्स आणि बायो इन्फॉमैर्टिक्स यावर पाकिस्तानच्या वैज्ञानिकांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे, जेणे करुन पाकिस्तान स्व:ता आपला डेटाबेस तयार करु शकेल. चीनकडून मिळालेल्या या प्रशिक्षणामुळे पाकिस्तानचे वैज्ञानिक स्व:ता विषाणूची ओळख करु शकणार आहेत. शिवाय या बॅक्येरिया आणि विषाणूवर काम करु शकणार आहेत.

चीन आणि पाकिस्तानने यापूर्वी crimean-congo hemorrhagic Fever Virus (CCHFV) वर काम केलं आहे. चीनवर आरोप झाले आहेत की, तो डीएनए संशोधन करुन जैविक शस्त्रास्त्र बनवत आहे. चीनमध्ये अनेक प्रयोगशाळा आहेत, जेथे जैविक शस्त्रास्त्र बनवण्याचे काम होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com