133 जणांना घेऊन जाणाऱ्या विमान अपघाताचं उलगडणार रहस्य; सापडले दोन ब्लॅक बॉक्स

133 जणांना घेऊन जाणाऱ्या विमान अपघाताचं उलगडणार रहस्य; सापडले दोन ब्लॅक बॉक्स

बीजिंग : अपघातग्रस्त चायना ईस्टर्न विमानाचे दोन ब्लॅक बॉक्स खराब स्थितीत आढळून आले असून या आधारे अपघाताच्या कारणांचा शोध घेता येणार आहे. रेकॉर्डर एवढे खराब झाले आहे की ते फ्लाइट डेटा रेकॉर्डर आहे की कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर हे ओळखताना अडचणी येत आहेत. (China plane crash)

133 जणांना घेऊन जाणाऱ्या विमान अपघाताचं उलगडणार रहस्य; सापडले दोन ब्लॅक बॉक्स
चीनमध्ये 133 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले

चीनच्या गुआंक्सी प्रांतात दोन दिवसापूर्वी चायना ईस्टर्न विमान कंपनीचे बोइंग ७३७ कोसळले. या विमानात कर्मचाऱ्यांसह १३२ प्रवाशांचा समावेश होता. सोमवारी दुपारी हे विमान डोंगरात कोसळले. अपघातस्थळ परिसरात पाऊस सुरू असल्याने तपासणी मोहीम थांबवण्यात आली होती. परंतु आज तपास पथकाने जंगल भागात डेटा आणि कॉकपिट व्हाइस रिकॉर्डरबरोबरच मृतदेहाचे अवशेषही जप्त केले. (China plane crash)

133 जणांना घेऊन जाणाऱ्या विमान अपघाताचं उलगडणार रहस्य; सापडले दोन ब्लॅक बॉक्स
दिल्ली-दोहा विमानाचं कराचीत इमर्जन्सी लँडिंग

त्यांचा तपास करण्यासाठी ड्रोन उपकरण, श्‍वानपथकाची मदत घेतली. तपास पथकांतील जवानांनी विमानाच्या धडकेने तयार झालेल्या खड्ड्यातील पाणी काढण्यासाठी पंपाची मदत घेतली. परंतु भूस्खलन होत असल्याने हे काम तत्काळ थांबवण्यात आले. चीन सरकारच्या माध्यमांनी दिलेल्या एका व्हिडिओ क्लिपनुसार बोइंग ७३७-८०० विमानाचे तुकडे जंगल क्षेत्रात विखुरलेले दिसतात. घटनास्थळावरून पर्स, बँकेचे पासबुक, ओळखपत्र देखील आढळून आले आहे. (China plane crash)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com