China Bio Weapon : चीन तयार करतंय आणखी एक 'बायो वेपन', संपूर्ण जगावर संकटाचं सावट; रिपोर्टमध्ये दावा

CCP बायोथ्रेट इनिशिएटिव्ह अंतर्गत चीन हे बायो वेपन तयार करत आहे.
China Bio Weapon
China Bio WeaponeSakal
Updated on

कोरोनानंतर (Corona) आता जगावर आणखी एक मोठं संकट येण्याची शक्यता आहे. चीनचं सरकार आपल्या सैन्याच्या मदतीने एक बायो वेपन तयार करत असल्याची माहिती समोर आली आहे. CCP बायोथ्रेट इनिशिएटिव्ह अंतर्गत चीन हे बायो वेपन तयार करत आहे.

सीएनएन-न्यूज१८ या माध्यमांनी याबाबतचा रिपोर्ट मिळाल्याचा दावा केला आहे. चीनचं सैन्य (पीपल्स लिबरेशन आर्मी) न्यूरोस्ट्राईक पद्धतीच्या शस्त्रांमध्ये प्रस्थापित म्हणून ओळखलं जातं. मानवांसह इतर सस्तन प्राण्यांच्या मेंदूवर हल्ला करण्यासाठी, किंवा त्यावर नियंत्रण आणण्यासाठी ही शस्त्रे ओळखली जातात.

China Bio Weapon
PM Modi US visit : भारताला अमेरिकेत मिळत असलेल्या मानपानामुळे चीन आणि पाकिस्तानचा जळफळाट होतोय का?

या रिपोर्टमध्ये असा दावा केला आहे, की या शस्त्रांच्या माध्यमातून मायक्रोव्हेव्ह किंवा थेट एनर्जी वेपन्स वापरून मेंदूवर हल्ला करतात. हँडहेल्ड गन, किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम अशा गोष्टींच्या माध्यमातून देखील हा हल्ला करता येतो.

न्यूरोस्ट्राईक वेपन्स म्हणजे काय?

न्यूरोस्ट्राईक म्हणजे, विशिष्ट नॉन कायनेटिक तंत्रज्ञानाचा वापर करून माणसांच्या थेट मेंदूंना लक्ष्य करणे. यामुळे मेंदूवर परिणाम होऊन, दूरगामी न्यूरोलॉजिकल डिग्रेडेशन होऊ शकतं.

China Bio Weapon
Netherlands PM Resigns : अखेर युतीचं सरकार कोसळलं! डच पंतप्रधान मार्क रुटे यांनी दिला राजीनामा

चीनची युद्धाची रणनीती

चीनच्या युद्धाच्या रणनीतीबाबत देखील या रिपोर्टमध्ये माहिती देण्यात आली आहे. २०२०-२१ यादरम्यान जेव्हा कोविड-१९ महामारीचा उद्रेक सर्वात तीव्र टप्प्यात होता; तेव्हाच दक्षिण चीन समुद्र, पूर्व चीन समुद्र, तैवान सामुद्रधुनी आणि भारत-चीन सीमेवर चीनच्या लष्करी हालचालींमध्ये मोठी वाढ दिसून आली. यामुळे एकीकडे बायो वेपन वापरुन, दुसरीकडे लष्करी कारवाई करायची अशी रणनीती चीन अवलंबत असल्याचं स्पष्ट झालंय.

संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांविरोधातील लढाईत चीनचं सर्वात प्रभावी शस्त्र म्हणजे न्यूरोस्ट्राईक असणार आहे. चीन या लढाईकडे मनोवैज्ञानिक युद्ध म्हणून पाहते. इतर देश जिथं केवळ अत्यंत आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये याचा विचार करू शकतात, तिथे चीन याचा सामान्यपणे वापर करण्याचा विचार करत आहे.

China Bio Weapon
USA on Manipur Violence: मणिपूर हिंसाचारात अमेरिकेकडून हस्तक्षेपाची तयारी; काँग्रेसकडून केंद्रावर हल्लाबोल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.