Netherlands PM Resigns : अखेर युतीचं सरकार कोसळलं! डच पंतप्रधान मार्क रुटे यांनी दिला राजीनामा

यानंतर देशात सार्वत्रिक निवडणुका होण्याच्या दृष्टीने हालचाल सुरू आहे.
Netherlands PM Resigns
Netherlands PM ResignseSakal
Updated on

नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांनी आज पहाटे आपल्या पदाचा राजीनामा दिला. यामुळे नेदरलँडचं सरकार कोसळलं आहे. यानंतर देशात सार्वत्रिक निवडणुका होण्याच्या दृष्टीने हालचाल सुरू आहे.

नेदरलँडमध्ये दोन पक्षांच्या युतीने सरकार स्थापन केलं होतं. मात्र, मायग्रेशन पॉलिसीबाबत या दोन्ही पक्षांचं एकमत होत नव्हतं. अखेर, सततचे वाद होत असल्यामुळे ही युती मोडली. त्यानंतर डच पंतप्रधान मार्क यांनी शुक्रवारी रात्री आपला राजीनामा सादर केला. एएनआयने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

Netherlands PM Resigns
US : "बोलण्याचं स्वातंत्र्य हे हिंसाचार करण्याचं लायसन्स नाही", अमेरिकेच्या खासदारांनी खलिस्तान समर्थकांना सुनावलं!

पंतप्रधान मार्क यांनी किंग विल्यम अ‍ॅलेक्झँडर यांच्याकडे आपला आणि मंत्रिमंडळाचा राजीनामा सुपूर्द केला. आज ते किंग विल्यम यांची भेट घेऊन याबाबत अधिक चर्चा करणार आहेत. स्थानिक माध्यमांनी याबाबत वृत्त दलं आहे.

"मायग्रेशन पॉलिसीवरून सत्ताधारी पक्षांमध्ये होत असलेला वाद सर्वांना माहितीच आहे. आज दुर्दैवाने आम्ही या निष्कर्षावर पोहोचलो आहोत, की हे मतभेद कधीही जुळणार नाहीत. त्यामुळे मी तातडीने संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा किंग विल्यम यांना लिखित स्वरुपात देणार आहे." असं मार्क हे एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना म्हणाले.

Netherlands PM Resigns
Afghanistan News : तालिबानला नवऱ्यांची काळजी! ब्यूटी पार्लर बंदीच्या आदेशानंतर दिलं भलंमोठं स्पष्टीकरण

"युक्रेन युद्धासोबतच मायग्रेशन पॉलिसी हादेखील एक तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे याबाबत योग्य निर्णय घेणं गरजेचं असल्याचं आमचं मत आहे." असं मार्क म्हणाले. त्यामुळे पुढच्या निवडणुकांमध्ये हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे.

मार्क यांच्या युती सरकारने जानेवारी २०२२ मध्ये पदभार स्वीकारला होता. नेदरलँडच्या राजकीय इतिहासातील ही सर्वात मोठी युती होती. मात्र काही दिवसांनंतरच या युतीमध्ये खटके उडण्यास सुरुवात झाली होती.

Netherlands PM Resigns
USA on Manipur Violence: मणिपूर हिंसाचारात अमेरिकेकडून हस्तक्षेपाची तयारी; काँग्रेसकडून केंद्रावर हल्लाबोल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.