दलाई लामांच्या राष्ट्रपती भेटीला चीनचा आक्षेप

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

बीजिंग- भारत आणि चीन यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना बाधा पोचू नये यासाठी चीनला ज्या महत्त्वाच्या विषयांमध्ये रस आहे अशा बाबींचा भारताने आदर करायला हवा, असा इशारा चीनने भारताला दिला आहे. तिबेटचे आध्यात्मिक गुरू चौदावे दलाई लामा यांनी राष्ट्रपती भवन येथे एका परिषदेदरम्यान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतल्याने चीनने त्यावर तीव्र आक्षेप नोंदवत वरील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

"चीनने अलीकडे यासंदर्भात गंभीरपणे तीव्र विरोध दर्शविला होता, मात्र भारत दलाई लामा यांचा राष्ट्रपती भवनातील कार्यक्रम आयोजित करण्यावर ठाम राहिला. त्याप्रमाणे दलाई लामा या कार्यक्रमात राष्ट्रपती मुखर्जी यांना भेटले," असे चीनच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते गेंग शुआँग यांनी बीजिंग येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

नोबेलविजेते कैलास सत्यर्थी यांच्या चिल्ड्रन फाऊंडेशनतर्फे राष्ट्रपती भवनात 'लॉरियएट्स अँड लीडर्स फॉर चिल्ड्रन समिट' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला दलाई लामा उपस्थित राहिल्याबाबत विचारले असता चीनचे प्रवक्ते शुआँग म्हणाले, "चीन याबद्दल अत्यंत नाराज असून, आमचा या गोष्टीला ठाम विरोध आहे."
 
Web Title: China protests Prez's meeting with Dalai Lama