esakal | भारत कोरोनाच्या विळख्यात; चीन मदत करण्यासाठी तयार

बोलून बातमी शोधा

modi and xi jinping

वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशातील आरोग्यव्यवस्थेवर प्रचंड ताण आहे. काही राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा आहे तर काही ठिकाणी रेमडेसिव्हिर मिळत नसल्यानं रुग्णांवर उपचारात अडचणी येत आहेत.

भारत कोरोनाच्या विळख्यात; चीन मदत करण्यासाठी तयार
sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - भारत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. देशात सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाचे तीन लाखांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशातील आरोग्यव्यवस्थेवर प्रचंड ताण आहे. काही राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा आहे तर काही ठिकाणी रेमडेसिव्हिर मिळत नसल्यानं रुग्णांवर उपचारात अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत आता भारताचा शेजारी देश चीनने मदतीचा हात पुढे करण्याबाबत वक्तव्य केलं आहे. कोरोनासोबत लढण्यासाठी बारतासोबत बोलण्यास तयार असल्याचं चीनने म्हटलं आहे. याबाबत हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या रिपोर्टनुसार, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे की, ते भारताला कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे यासाठी भारतासोबत बोलण्यास तयार आहे. चीन, भारताच्या गरजेनुसार मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार आहे. गुरुवारी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेन्बिन यांनी सांगितलं की, चीनला याची माहिती आहे की, भारतातील परिस्थिती गंभीर आहे. कोरोनाला रोखण्यासाठी साधने अपुरी पडत आहेत.

वांग यांनी चीनच्या अधिकृत माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली होती. त्यांना विचारण्यात आलं होतं की, भारतात पसरत असलेल्या कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चीन काय करत आहे? यावर वांग यांनी सांगितलं होतं की, चीनकडून आवश्यक ती मदत आणि पाठिंबा देण्याची तयारी आहे. अर्थात चीनकडून हे वक्तव्य करण्यात आलं असलं तरी कशाप्रकारची मदत करण्याची तयारी आहे हे स्पष्ट केलेलं नाही.

हेही वाचा: Corona Update: कहर! सलग तिसऱ्या दिवशी ३ लाखाहून अधिक नवे रुग्ण

कोरोना हा मानव जातीचा शत्रू आहे आणि जगाला सध्या या कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी एक होण्याची गरज आहे असंही त्यांनी म्हटलं होतं. गेल्या वर्षी चीनला वैद्यकीय करणाऱ्या देशांमध्ये भारताचाही समावेश होता. भारताने चीनला 15 टन वैद्यकीय साधने पुरवली होती. त्यामध्ये मास्क, ग्लोव्हज आणि इतर साहित्य होतं. या साहित्याची किंमत जवळपास 2 कोटी 11 लाख रुपये इतकी होती.

हेही वाचा: सलाम तिच्या कार्याला! बेवारस मृतदेहांना 16 वर्षांची मुलगी देतेय अग्नी

एका पत्रकार परिषदेवेळी भारतातील चीनचे राजदूत सून विडॉन्ग यांनी भारताने केलेल्या मदतीचं कौतुक केलं होतं. तर चीनने एप्रिल महिन्यात वैद्यकिय मदत करून भारताने केलेल्या उपकाराची परतफेड केली होती. त्यावेळी भारत पहिल्या लाटेचा सामना करत होता आणि देशातील परिस्थिती बिकट होती.