esakal | कोरोनाच्या चौकशीला चीनचा नकार; WHO चा प्रस्ताव धुडकावला
sakal

बोलून बातमी शोधा

china coronavirus death toll crosses 800 Exceeds SARS deaths

कोरोनाच्या चौकशीला चीनचा नकार; WHO चा प्रस्ताव धुडकावला

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जीनिव्हा : कोरोनाच्‍या साथीत जगभरात लाखो लोकांचा जीव गेला, तरी या विषाणूची उत्पत्ती कोठून झाली, हे समजू शकलेले नाही. यासाठी दुसऱ्यांदा चौकशी करण्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा (WHO) प्रस्ताव चीनने गुरुवारी धुडकावला. या प्रस्तावात जी भाषा वापरली आहे, त्यात कोठेही विज्ञानाप्रती आदर व्यक्त होत नसल्याने धक्का बसल्याचे चीनने म्हटले आहे.

हेही वाचा: कर्नाटक राज्याचा कोण होणार मुख्यमंत्री?

विषाणूच्या उगमाच्या अभ्यासाचे राजकारणाला चीनचा विरोध आहे, असे राष्ट्रीय आरोग्य आयोगाचे (एनएचसी) उपमंत्री झेंग यिक्झिन म्हणाले. कोरोना विषाणूचा उगम प्रयोगशाळेत झाल्याच्या निष्कर्ष चीनने फेटाळला आहे. ‘डब्लूएचओ’चे अध्यक्ष टेड्रॉस अधोनोम घेब्रेयसूस यांनी गेल्या आठवड्यात कोरोनाच्या उत्पत्तीचा शोध घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय तपासाचा दुसऱ्या टप्पा सुरू करण्याचा विचार व्यक्त केला होता. कोरोनाची जागतिक साथ आणि त्याचा प्रयोगशाळेतील उगमाची शक्यता फेटाळणे हे घाई करण्यासारखे ठरेल. शास्त्रज्ञ कोरोनाचे मूळ शोधत असल्याने चीनची भूमिका पारदर्शक असावी, असे सांगण्यात आल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा: दैनिक भास्करच्या कार्यालयांवर IT चा छापा; संसदेत पडसाद

चीनवर दबाव

दुसऱ्या टप्प्यात चीनमधील प्रयोगशाळांचीही तपासणी केली पाहिजे, असे मतही घेब्रेयसूस यांनी व्यक्त केले होते. याचा विरोध चीनने आज केला असून कोरोनाच्या उगमाचा अभ्यास पुन्हा करण्याचा ‘डब्लूएचओ’चा प्रस्ताव धुडकावला आहे. अमेरिका व अन्य देशांकडून चीनमधील ‘वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी’ या प्रयोगशाळेची चौकशी करण्यासाठी दबाव आणली जात आहे. अमेरिकेच्‍या परराष्ट्र मंत्रालयाच्या उपमंत्री वेंडी शरमन या येत्या रविवारी (ता.२५) चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

loading image