esakal | चीनमध्ये आणखी एका व्हायरसचा कहर अन्...
sakal

बोलून बातमी शोधा

china report tick borne sfts virus and seven dead

चीनमधील वुहान शहरामधून जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसने लाखो नागरिकांचा जीव घेतला असून, त्यावर लस तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

चीनमध्ये आणखी एका व्हायरसचा कहर अन्...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

बीजिंग (चीन) : चीनमधील वुहान शहरामधून जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसने लाखो नागरिकांचा जीव घेतला असून, त्यावर लस तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. चीनमध्ये आणखी एक व्हायरस आला असून, या व्हायरसची लागण होऊन सात जणांचा मृत्यू झाला आहे. एसएफटीएस व्हायरस (SFTS Virus) असे या व्हायरसचे नाव आहे.

Video: बिबट्या शिकार घेऊन किती वेळा आदळला पाहाच...

चीनमध्ये एसएफटीएस व्हायरसचे रुग्ण आढळू लागले आहेत. या संसर्गजन्य आजारामुळे सात जणांचा मृत्यू झाला असून, 60 पेक्षा अधिक जणांना याची लागण झाली आहे. चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 'संबंधित आजार हा संसर्गजन्य आहे. माणसांमार्फत माणसांमध्ये पसरण्याची शक्यता आहे. यामुळे नागिरकांनी सावधानता बाळगावी. पूर्व चीनच्या जियांग्सू प्रांतात एसएफटीएस व्हायरसमुळे 37 पेक्षा अधिक जणांना लागण झाली आहे. अन्हुई प्रांतात 23 जणांना या व्हायरसची लागण झाली आहे.'

रस्त्यावरील कुत्रा बनला अधिकृत सेल्समन!

जियांग्सूची राजधानी नानजियांगमध्ये या व्हायरसमुळे एका महिलेमध्ये सुरुवातीला खोकला आणि तापासारखी लक्षणे दिसून आली होती. पुढे तिच्या शरीरात ल्युकोसाइट आणि प्लेटलेट कमी झाल्याचे डॉक्टरांना समजले. एक महिन्याच्या उपचारानंतर या महिलेला रुग्णालयातून सोडण्यात आले. अहवालानुसार, अन्हुई आणि पूर्व चीनमध्ये झेनियांग प्रांतात कमीत कमी सात लोकांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, एसएफटीएस हा व्हायरस नवा नाही. चीनला 2011 साली या व्हायरसची माहिती झाली होती. प्राण्यांच्या शरीरावर चिकटणाऱ्या किटाणूंमुळे हा आजार माणसांमध्ये पसरतो आणि माणसांमार्फत माणसांमध्येही त्याचा प्रसार होऊ शकतो.

loading image