रस्त्यावरील कुत्रा बनला अधिकृत सेल्समन!

वृत्तसंस्था
Wednesday, 5 August 2020

कुत्रा हा इमानी प्राणी म्हणून ओळखला जात असून, अनेकांच्या कुटुंबातील सदस्य असतो. पण, रस्त्यावरील एका कुत्र्याचे भविष्य फळफळले असून, एका कंपनीने त्याला अधिकृत सेल्समन बनविले आहे. कुत्र्याचे ओळखपत्र असलेले छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बोलिवीया (ब्राझील): कुत्रा हा इमानी प्राणी म्हणून ओळखला जात असून, अनेकांच्या कुटुंबातील सदस्य असतो. पण, रस्त्यावरील एका कुत्र्याचे भविष्य फळफळले असून, एका कंपनीने त्याला अधिकृत सेल्समन बनविले आहे. कुत्र्याचे ओळखपत्र असलेले छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कारागृहातून मुलाला पळविण्यासाठी आईने खोदले भुयार पण...

ब्राझीलमध्ये असलेल्या ह्युंदाई कंपनीच्या शोरुमबाहेर एक कुत्रा फिरत असे. शोरुममधील कर्मचाऱयांसोबत त्याची मैत्री बनली. काही दिवसांमध्येच तो शोरुमचा एक सदस्य झाला होता. शोरूमध्ये त्याचा दिवसेंदिवस वापर वाढत चालला होता. कंपनीच्या मिटिंगलाही तो हजेरी लावू लागला. यानंतर शोरुमने त्याला ओळखपत्र द्यायचे ठरवले. काही दिवसातच त्याचे ओळखपत्र तयार केले आणि त्याच्या गळ्यात घातले. संबंधित छायाचित्र सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ह्युंदाई ब्राझीलने त्याचा फोटो शेअर करताना म्हटले आहे की, ह्युंदाई प्राइम डीलरशिपमध्ये सेल्स डॉग टक्सन प्राइमला भेटा. या नव्या सदस्याचे वय आहे 1 वर्षे आहे. ह्युंदाई परिवार याचे स्वागत करतो. हा आधीपासूनच शोरूममधील कर्मचाऱ्यांशी आणि ग्राहकांसोबत चांगला व्यवहार करत होता. डॉग टक्सनचे शोरूमच्या आतच एक कॅबिन आणि घर आहे. तो शोरूमच्या मीटिंगमध्येही सहभागी होतो. इतरांप्रमाणेतो कामेही करतो. सध्या शोरूममध्ये येणाऱ्या ग्राहकांचे लक्ष त्याने आकर्षित केले आहे. शहरात तो चर्चेचा विषय ठरला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Passa meu biscoito de comissão pra cá Presidente vendi tenho direito ! #tucson #prime #hyundai @primehyundai

A post shared by TUCSON PRIME (@tucson_prime) on

दरम्यान, सोशल मीडियावर छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्स शोरूमचे कौतुक करत आहेत. कारण शोरूमने एका रस्त्यावरील कुत्र्याला मोठा मान दिला आहे.

'तो' कॅमेराकडे फक्त 2 तास बघत बसला अन्...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hundai showroom adopts street dog makes-him car salesman photo viral