इतर राष्ट्रांच्या अंतर्गत गोष्टींमध्ये काडीचाही रस नाही; चीनचा हास्यास्पद दावा

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 6 November 2020

आम्ही कोणत्याही देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करत नाही, किंवा आम्हाला त्यात रसही नाही, असं वक्तव्य चीनकडून करण्यात आले आहे.

बिंजिंग- आम्ही कोणत्याही देशांच्या अंतर्गत गोष्टींमध्ये हस्तक्षेप करत नाही, किंवा आम्हाला त्यात रसही नाही, असं वक्तव्य चीनकडून करण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन गुरुवारी बिजिंगमध्ये पत्रकारांशी बोलताना असं म्हणाले आहेत. चीनचा हा दावा हस्यास्पद असल्याची प्रतिक्रिया उमटू लागली आहे. 

ऑस्ट्रेलियामध्ये एका व्यक्तीला परराष्ट्र हस्तक्षेपाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे. हा व्यक्ती चिनी कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित आहे. व्यक्तीला गुरुवारी कोर्टासमोर हजर करण्यात आले होते. या प्रकरणी बोलताना चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग यांनी चीन कोणात्याही देशांच्या अंतर्गत गोष्टींमध्ये ढवळाढवळ करत नसल्याचे म्हटलं आहे. शिवाय असा हस्तक्षेप करण्यात आम्हाला कोणताही रस नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

पुढील महामारीसाठी तयार रहा; WHO ने दिला गंभीर इशारा

दरम्यान, चीनकडून अनेक देशांच्या कारभारामध्ये आणि अंतर्गत गोष्टींमध्ये हस्तक्षेप होत असतो. चीनने तैवान देशामध्ये ढवळाढवळ सुरु केली आहे. तसेच अमेरिकेसारखे मोठ्या देशांच्या निवडणुकीमध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप चीनवर झाला आहे. शिवाय यासंबंधीचे पुरावेही अमेरिकेने पुढे आणले आहेत. त्यामुळे चीनचा दावा हास्यास्पद ठरतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: China Says Has Never Interfered In Other Countries Affairs