esakal | पुढील महामारीसाठी तयार रहा; WHO ने दिला गंभीर इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

world health organisation

जागतिक आरोग्य संघटनेनेही कोरोनाच्या दुसऱ्या लोटेला दुजोरा दिला आहे.

पुढील महामारीसाठी तयार रहा; WHO ने दिला गंभीर इशारा

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

जिनिव्हा: कोरोना महामारीमुळे सध्या संपुर्ण जगाचं अर्थचक्र थांबलं आहे. चिंताजनक बाब म्हणजे आता जागतिक आरोग्य संघटनेनेही कोरोनाच्या दुसऱ्या लोटेला दुजोरा दिला आहे. तसेच पुढे येणाऱ्या जागतिक महामारीला तोंड देण्यासाठी तयार राहण्याचे आवाहनही केले आहे.

WHO ची त्रिसुत्री-
विविध देशांनी त्यांच्या आरोग्यव्यवस्था सुधारण्यावर भर दिला पाहिजे, असा सल्लाही WHO ने दिला आहे. तसेच कोरोनावर मात करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने एक त्रिसूत्री सुचवली आहे. या त्रिसूत्रीमध्ये विज्ञान, आरोग्यविषयक योग्य उपाययोजना आणि संकटाविरुध्द लढण्यासाठीच्या एकतेचा समावेश आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना वर्षाला मिळणारा पगार ऐकला तर...

युरोपात दुसरी लाट-
सध्या युरोपात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. दिवसेंदिवस तिथले कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. युरोपातील ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि बेल्जियमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असून तिथे लॉकडाऊन जाहीर केलं आहे. 

अमेरिकेतही कोरोनाचा कहर-
अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोरोना संसर्गावरील नियंत्रण हा चर्चेचा मुद्दा ठरला असला तरी प्रत्यक्ष प्रचाराच्या धामधुमीत त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. अमेरिकेत आज नव्याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. हिवाळ्यात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे.

US Election- निकालाच्या गोंधळात कोरोनाचा कहर; 24 तासांत रुग्णांची विक्रमी वाढ

मागील 24 तासांत अमेरिकेत कोरोनाचे आतापर्यंतचे एका दिवसातील सर्वाधिक 1 लाख 20 हजार रुग्ण आढळले आहेत. ही बाब चिंताजनक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. आतापर्यंत अमेरिकेत कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्या 96 लाखांच्या वर गेली आहे. तर 2.34 लाख कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

(edited by- pramod sarawale)

loading image