चीन तालिबानसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्यासाठी तयार

जगातील बहुतांश देश तालिबानला मान्यता देण्यास तयार नाहीत.
xi jinping
xi jinpingfile photo

काबूल: अफगाणिस्तानात (afganistan) सत्तांतर होणार हे स्पष्ट आहे. तिथे पुन्हा एकदा सत्तेच्या चाव्या तालिबानच्या (Taliban) हाती जाणार आहेत. तालिबानच्या राजवटील मान्यता देण्यावरुन विविध मतमतांतर आहेत. जगातील बहुतांश देश तालिबानला मान्यता देण्यास तयार नाहीत. त्याचे कारण त्यांची कट्टरपंथीय विचारधारा आहे.

तालिबानच्या राजवटीत स्त्रियांचे अधिकार, आवाज दडपला जातो. मूलभूत अधिकारांवर गदा आणणारे अनेक नियम लागू केले जातात. त्यामुळे जगातील बहुतांश देशांचा तालिबानला विरोध आहे. तालिबानच्या हाती सत्ता गेल्यामुळे आशियातील काही समीकरण बदलणार आहेत.

xi jinping
अमेरिका तालिबानच्या राजवटीला मान्यता देईल, पण....

शेजारच्या चीनने तालिबानबद्दल अनुकूल भूमिका घेतली आहे. चीनने तालिबानसोबत मैत्रीपूर्ण संबंध विकसित करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. "आम्ही अफगाणि जनतेच्या अधिकारांचा आदर करतो. अफगाणिस्तानसोबत मैत्रीपूर्ण आणि सहकार्याचे संबंध विकसित करण्याची आमची इच्छा आहे" असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी पत्रकारांना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com