

China School Lift
Esakal
China Viral Video: चीनचा युन्नान प्रांत हा दुर्गम आणि पर्वतांनी वेढलेला आहे. युन्नान प्रांतातील निझू नदीच्या खोऱ्यात निझूहे गावात विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी तीन तास पायपीट करावी लागत होती. उभे कडे, दऱ्या खोऱ्यातून जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांना शाळेत जावं लागायचं. कडेकपारीत थोडीशी चूक पण जीवावर बेतू शकते अशा स्थितीत विद्यार्थी प्रवास करायचे. पण या विद्यार्थ्यांसाठी प्रशासनाने दरीतून थेट कड्यावर जाण्यासाठी २६३ मीटर उंचीची लिफ्ट उभारली. यामुळे ३ तासांचा रस्ता अवघ्या काही मिनिटात आणि आरामात पार करून विद्यार्थी आता शाळेत जातायत.