"हा संयमाचा खेळ आहे, ज्याचा पेशन्स आधी सुटेल तो हरेल..." - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

"हा संयमाचा खेळ आहे, ज्याचा पेशन्स आधी सुटेल तो हरेल..." - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना समाजात विकृती पोहचवणार्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फैलावर घेतलंय. कोरोना तर जाईल मात्र समाजात विकृती पसरावणार्यांना कायद्याच्या कचाट्यातून कुणीही सोडवू शकणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणालेत. हा पेशन्स म्हणजेच संयमाचा खेळ आहे, ज्याचा पेशन्स संपला तो हरला, त्यामुळे तुमचा पेशन्स सोडू नका असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलाय.  जाणून घेऊयात काय म्हणालेत मुख्यमंत्री       

एकात्मतेला तोडण्याचा कुणीही प्रयत्न करू नये : 

"आपण जे केलंय तेच आज सिंगापूर कडून करण्यात येतंय. त्यामुळे घरात राहणं हा एकच इलाज कोरोनाला हरवण्यासाठी आहे. सर्व जगात हाच पर्याय अवलंबला जातोय. सर्व पक्षीय नेते, सर्व धर्मीय, अनेक संस्था, अनेक व्यक्ती, अनेक दिग्गज आज काहीतरी करू पाहत आहेत. त्या सर्वांना माझे मनापासून हात जोडून धन्यवाद. अगदी हात जोडून धन्यवाद." 

"मी विनंती, धन्यवाद, कृपा हे शब्द जरी वापरात असलो तरी ते महाराष्ट्रातील जनता, बंधू भगिनींसाठी वापरतोय. जर कुणी कोणत्याही प्रकारे कोरोनाचा फायदा घेऊन समाजात विकृती पसरवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला कायद्याच्या कचाट्यातून कुणीही वाचवू शकणार नाही. नोटांना थुंकी लावणं, नर्सेसला त्रास देणं ही वृत्ती गमतीततही खपवून घेतली जाणार नाही. असं जो करेल त्याला कायद्यापासून कुणीही वाचवू शकणार नाही. आज आपण जात पात धर्म विसरून एकत्र येत आहोत, या एकात्मतेला कुणीही तोडण्याचा प्रयत्न करू नये", असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत  

बरं होऊन घरी जाणाऱ्यांची देखील संख्या वाढतेय : 

"महाराष्ट्रात कोरोनाच्या केसेस वाढतायत. जगाच्या तुलतेत आपण अपवाद ठरण्याचा प्रयत्न करतोय. महाराष्ट्रात आणि मुंबईत चाचण्यांची केंद्र वाढवली आहेत. या मार्फत कुणी आमच्याकडे येण्याआधी आपण अशाना शोधून काढतोय. दुर्दैवाने काहींचा मृत्यू देखील झालाय. मात्र जशी रुग्णांची संख्या वाढतेय तशीच बरं होऊन घरी जाणाऱ्यांची देखील संख्या वाढतेय. कोरोना विरुद्धची लढाई ऐन जोरात असतात आपल्याला आपल्या जेष्ठांची काळजी घेणं महत्त्वाचं आहे 

तुमच्या भागातील तबलकिंची माहिती द्या : 

केंद्राकडून दररोज एक यादी प्रत्येक राज्याला दिली जातेय. यामध्ये मरकज मधून येणाऱ्यांची नावं आहेत आणि त्यांचा ठावठिकाणा शोधण्यास सांगितलं जातंय. अशात आतापर्यंत महाराष्ट्र सरकारने अशा सर्वांना शोधून काढलंय आणि सरकारी क्वारंटाईन केंद्रांमध्ये त्यांना ठेवण्यात आलंय. मात्र तुमच्या भागात असं कुणी राहत असेल तर त्याची तातडीने पोलिसांना आणि सरकारी कर्मचाऱ्यांना माहिती द्या, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केलंय. 
  
महाराष्ट्र काळजी घेतोय : 

महाराष्ट्रात जवळपास पाच लाखांच्या आसपास इतर राज्यातून आलेले मजूर आहेत. त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची आणि राहण्याची, वैद्यकीय सेवा देण्याची काळजी घेतली जातेय. त्यामुळे महाराष्ट्रातून कुणालाही कुठेही जायची गरज नाही. दरम्यान आम्ही जशी महाराष्ट्रात नागरिकांची सोय करतोय, तशीच सोय इतर राज्यांनी देखील करावी. महाराष्ट्रातील मात्र बाहेर राज्यात असणाऱ्यांना काही गैरसोय होत असेल तर त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला याबाबत माहिती कळवावे. आम्ही संबंधित राज्य शासनाशी बोलून तुमची सोय करू, हा महत्त्वाचा मेसेज मुख्यमंत्र्यांनी दिलाय. 

सर्दी ताप खोकला असेल तर कोविड रुग्णालयात जा :

मुंबईत आणि राज्यात आपण कोविडसाठी रुग्णालये बनवत आहोत. ज्यांना सर्दी खोकला ताप असेल त्यांनी सदर डॉक्टरांकडे न जाता कोविड रुग्णालयात जावं. जेणेकरून कुणालाही संसर्ग असेल तर त्याचं योग्य निदान केलं जाईल आणि इतर दवाखाने सिल करावे लागणार नाहीत. आपण अत्यावश्यक कामासाठी बाहेर जाणार असाल तर स्वच्छ रुमाल बांधा, त्यामुळे आपल्यापासून आणि कुणापासून आपल्याला संसर्ग होण्यार नाही.   

हा संयमाचा खेळ आहे, ज्याचा पेशन्स आधी सुटेल तो हरेल.. 

येत्या काही दिवसात, पुढच्या सूचना येईपर्यंत महाराष्ट्रात कोणताही राजकीय, धार्मिक, क्रीडा, कार्यक्रमांना परवानगी देण्यात येणार नाही. मुंबई जिद्दी आहे, सर्वांचं लक्ष मुंबईकडे असतं, कोरोनाचं देखील मुंबईवर लक्ष आहे. मात्र मुंबईत काही होणार नाही. माझा माझ्यापेक्षा तुमच्यावर विश्वास आहे. माझ्या महाराष्ट्रात आत्मविश्वास आहे आणि याच अस्त्राने आपण कोरोनावरमात करूयात. हा संयमाचा खेळ आहे, ज्याचा पेशन्स आधी सुटेल तो हरेल, असं देखील मुख्यमंत्री म्हणालेत.  

its game of patience says maharashtra cm uddhav thackeray uddhav thackery while communication with maharashtra
  
.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com