Breaking : चीन-तैवान तणाव वाढला; चीनकडून तैवानमध्ये मिसाईल हल्ले | China-Taiwan tensions : चीन-तैवान तणाव वाढला; चीनकडून मिसाईल हल्ले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

China-Taiwan tensions

China-Taiwan tensions : चीन-तैवान तणाव वाढला; चीनकडून मिसाईल हल्ले

बीजिंग : चीनने गुरुवारी तैवानच्या समुद्रात बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. तसेच लढाऊ विमाने आणि युद्धनौका तैनात केल्या. शिवाय तैवानभोवती आतापर्यंतचा सर्वात मोठा लष्करी सराव केला. यूएस हाऊस स्पीकर नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीनंतर चीन संतप्त झाला आहे. त्यानंतर चीनकडून ११ बॅलिस्टिक क्षेपनास्त्रे डागण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. (China-Taiwan tensions)

हेही वाचा: China-US : साउथ चीन समुद्रावर वर्चस्वासाठी चीन-अमेरिका महाशक्ती आमने-सामने

मागील अनेक वर्षांमध्ये तैवानला भेट देणाऱ्या पेलोसी एकमेव हायप्रोफाईल यूएस अधिकारी आहे. त्यांनी धमक्यांकडे दुर्लक्ष करत तैवानला भेट दिली. त्याला प्रत्युत्तर म्हणून, चीनने तैवानच्या आजूबाजूच्या अनेक झोनमध्ये सरावांची मालिका सुरू केली. हे हल्ले जगातील सर्वात व्यस्त शिपिंग लेन असलेल्या किनाऱ्यापासून केवळ २० किमी अंतरावर करण्यात आले.

ईस्टर्न थिएटर कमांडचे प्रवक्ते वरिष्ठ कर्नल शी यी यांनी एका निवेदनात म्हटले की, क्षेपणास्त्रांची अचूकता आणि शत्रूला एखाद्या भागात प्रवेश किंवा नियंत्रण नाकारणे हाच या हल्ल्यामागचा उद्देश होता.

तैवानने सांगितले की, चिनी सैन्याने १1 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. ज्यामुळे प्रादेशिक शांतता बिघडली आहे. याचा आम्ही निषेध करतो. मात्र क्षेपणास्त्रे आदळली किंवा बेटावरून उड्डाण केला का याविषयी तैपेईने सांगितले नाही. दुसरीकडे लष्करी कवायती रविवारी दुपारपर्यंत चालतील असे बीजिंगकडून सांगण्यात आलं आहे.

Web Title: China Taiwan Tensions Post Pelosi Visit

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :ChinaTaiwan