तैवानच्या स्वातंत्र्याला समर्थन देऊ नका, अन्यथा...; चीनची भारताला गंभीर धमकी

xi_modi_india_ap
xi_modi_india_ap

बिजिंग- चीनची सरकारी वृत्तवाहिनी ग्लोबल टाईम्सने तैवानच्या मुद्द्यावरुन भारताला थेट धमकी दिली आहे. भारत तैवानला साथ देऊन अडचणी वाढवत आहे. भारत तैवानच्या स्वातंत्र्याचे समर्थन करत असेल किंवा चीनच्या थेरीला नाकारत असेल तर आम्हालाही भारतीय फुटीरतावाद्यांना समर्थन द्यावे लागेल, असा इशारा ग्लोबल टाईम्सने दिला आहे. नुकतेच तैवानच्या राष्ट्रीय दिनाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात भारतीयांनी शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर तैवानच्या राष्ट्रपती त्साई इन वेंग यांनी ट्विट करुन भारतीयांचे आभार मानले होते. 

तैवानच्या समर्थनामुळे चिडला चीन

सीमेवरील तणाव आणि चीन-अमेरिकेच्या संघर्षादरम्यान भारत तैवान कार्ड खेळण्याचा प्रयत्न करत आहे. भारताच्या अनेक माध्यमांनी 10 ऑक्टोबर रोजी तैवानच्या राष्ट्रीय दिनादिवशी जाहिराती लावल्या होत्या. एका भारतीय न्यूज चॅनेलने तैवानचे विदेश मंत्री जोसेफ वू यांची मुलाखत प्रकाशित केली होती. या मुलाखतीने तैवानची स्वतंत्रता आणि फुटीरतावादी विचारधारा पसरवण्याचं काम केलं आहे, असं ग्लोबल टाईम्सच्या संपादकीयात म्हणण्यात आलंय.

अर्मेनिया आणि अझरबैजानमध्ये पुन्हा एकदा शस्त्रसंधी

भारत तैवान कार्डचा वापर सीमा वाद सोडवण्यासाठी किंवा चीनवर दबाव वाढवण्यासाठी करु शकत नाही. भारताने तैवान स्वातंत्र्याबाबत समर्थन न दाखवण्याची तयारी दाखवली होती. पण, भारत आता याच्या उलट काम करत आहे. याला प्रत्युत्तर म्हणून चीन भारतातील फुटीरतावादी शक्तींना समर्थन देऊ शकतो, असं ग्लोबल टाईम्सने म्हटलंय. तैवानच्या फुटीरतावादी शक्ती आणि भारताच्या फुटीरतावादी शक्ती एकाच श्रेणीमध्ये येतात. भारत जर तैवान कार्ड खेळत असेल तर चीनही भारतीय फुटीरतावादी कार्ड खेळू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.  

भारत तैवानच्या स्वातंत्र्याला समर्थन देत असेल तर चीन भारतीय राज्य जसे की त्रिपुरा, मेघालय, मिझोरम, मणिपुर, आसाम नागालँडमध्ये फुटीरतावादी शक्तींचे समर्थन करु शकते. यासाठी चीनकडे कारणही आहे. शिवाय सिक्किमच्या पुनरुत्थानचेही समर्थन केले जाऊ शकते, अशी गंभीर धमकी ग्लोबल टाईम्सने दिली आहे. 

(edited by- kartik pujari)


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com