esakal | अफगाणिस्तानात चीन उभारणार औद्योगिक मंच
sakal

बोलून बातमी शोधा

अफगाणिस्तानात चीन उभारणार औद्योगिक मंच

अफगाणिस्तानात चीन उभारणार औद्योगिक मंच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

काबूल: अफगाणिस्तानमध्ये औद्योगिक मंच स्थापण्याची तयारी चीनने चालविली असून पुढील आठवड्यात याची औपचारिक घोषणा अपेक्षित आहे. चायना टाऊन इन काबूल या नावाने चीनच्या औद्योगिक प्रतिनिधींचे एक पथक यासाठी प्रयत्नशील आहे. ते एक संस्था उभारणार असून अफगाण इन्स्टिट्यूट असे तिचे नाव असेल. ग्लोबल टाइम्स या चीनच्या सरकारी मुखपत्राने दिलेल्या वृत्तानुसार अफगाणिस्तानच्या पुनर्बांधणीसाठी गुंतवणुकीच्या संधी हेरण्याचे काम या संस्थेचे असेल.

हेही वाचा: अफगाणिस्तानात पत्रकारांवरही बंधन? आंदोलनाचं रिपोर्टिंग पडलं महागात

पथकाच्या एका सदस्याने दिलेल्या माहितीनुसार स्थानिक उद्योग आणि इतर संस्थांसह संयुक्त मंच उभारण्यासाठी यापूर्वीच करार करण्यात आले आहेत. वैयक्तिक सुरक्षा, सरकारबरोबर विविध प्रकारच्या मंजुरीसाठी समन्वय, बँकेच्या माध्यमातून चलनाची देवाणघेवाण, संस्थेसाठी कर आणि पायाभूत सुविधा अशा सेवा चायना टाऊन इन काबूल पुरविणार आहे. आतापर्यंत पायाभूत सुविधा निर्मिती, खाण उद्योग या क्षेत्रांतील चीनच्या विविध कंपन्यांनी आपल्याशी संपर्क साधला आहे.

चीनची मदत

तालिबानचे सरकार स्थापन झाल्यानंतर २० कोटी युआन इतकी मदत देण्याची चीनची घोषणा अफगाण जनतेच्या गरजेनुसार धान्य, हिवाळ्यात लागणाऱ्या वस्तू, लस, औषधांचा पुरवठा करणार.

loading image
go to top